26 C
Mumbai
Thursday, February 26, 2026
घरविशेषपुनौरा धामात उभारणार भव्य जानकी मंदिर

पुनौरा धामात उभारणार भव्य जानकी मंदिर

Google News Follow

Related

बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात असलेल्या पवित्र पुनौरा धामात, आई जानकी (माता सीता) यांच्या जन्मस्थळी भव्य मंदिराच्या निर्माणासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चार व धार्मिक विधींसह भूमिपूजन व शिलान्यास करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी मंदिरात पूजा-अर्चा करून आशीर्वाद घेतला.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या धर्तीवर या भव्य मंदिराचे बांधकाम ६७ एकर भूखंडावर करण्यात येणार असून एकूण खर्च सुमारे ८८२.८७ कोटी रुपये असणार आहे. मंदिराची उंची १५१ फूट असेल आणि २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भूमिपूजनासाठी देशभरातील २१ तीर्थक्षेत्रांतील माती आणि ३१ नद्यांचे पवित्र जल आणले गेले होते. तसेच तिरुपती बालाजी मंदिराच्या नमुन्यावर ५० हजार लाडूंची पॅकेट्स तयार करण्यात आली होती.

या सोहळ्यात बिहारमधील मंत्री, केंद्र सरकारमधील मंत्री, साधू-संत, आणि हजारो भाविक उपस्थित होते. संपूर्ण वातावरण अध्यात्मिकतेने भारलेले होते. राज्य सरकार व पर्यटन विभाग या कार्यक्रमाला ऐतिहासिक बनवण्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत होते.

पुनौरा धाम ही माता सीतेची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. येथे उभारले जाणारे मंदिर भविष्यकाळात धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनण्याची शक्यता आहे. भाविकांसाठी सर्व आधुनिक सुविधा मंदिर परिसरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पुनौरा धाम पूर्णतः तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झाल्यास बिहारमधील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधींमध्येही लक्षणीय वाढ होईल.

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या धर्तीवर सीतामढीतील पुनौरा धामाचा समग्र विकास २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या तिथ क्षेत्रात सुमारे ६७ एकर जमीन समाविष्ट असून, रामायण सर्किट‘हिंदू सर्किट’ योजना अंतर्गत बाबा अजगैबीनाथ, सिंहेश्वर, उग्रतारा, चंडीस्थान, त्रिवेणी, मतिहानी, सुलेश्वर अशा १४ प्रमुख मंदिरांचाही विकास करण्यात येणार आहे. याशिवाय बोधगया, देवघर, गया, वैशाली यांसारख्या बौद्ध व जैन स्थळांचाही समावेश आहे.

या सर्व तीर्थ, मठ-मंदिरांचा विकास झाल्यास हॉटेल, रेस्टॉरंट, ट्रान्सपोर्ट, गाइडिंग, हस्तकला, स्थानिक बाजारपेठ व इतर सेवांमुळे हजारो नवीन रोजगार संधी निर्माण होतील. स्थानिक तरुण, महिला आणि लघु उद्योजकांसाठी हे एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा