33 C
Mumbai
Thursday, May 28, 2026
घरविशेष'देशभक्त मनोज तिवारींच्या विरुद्ध तुकडे-तुकडे गँगचा लीडर कन्हैया कुमार'

‘देशभक्त मनोज तिवारींच्या विरुद्ध तुकडे-तुकडे गँगचा लीडर कन्हैया कुमार’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

Google News Follow

Related

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीतील भाजपचे ईशान्य दिल्लीतील लोकसभा उमेदवार मनोज तिवारी यांचा प्रचार करत आहेत. मनोज तिवारी यांच्या विरुद्ध काँग्रेसचे कन्हैया कुमार उभे आहेत.दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कन्हैया कुमार यांना तुकडे तुकडे गँगचा लीडर म्हणून संबोधले आहे.दिल्लीमध्ये प्रचारादरम्यान एका वाहिनीशी संवाद साधताना त्यांनी टीका केली.

भाजप उमेदवाराच्या विरुद्ध कन्हैया कुमार आहे तुम्हाला याबाबत काय वाटत?, असा प्रश्न उपमुख्यमंत्री फडणवीसांना विचारण्यात आला.यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, या ठिकाणची लढाई देशभक्त मनोज तिवारी विरुद्ध तुकडे तुकडे गँगचा लीडर कन्हैया कुमार अशी आहे.देशभक्तांची ही दिल्ली आहे.त्यामुळे मनोज तिवारी आणि पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभी राहील.मनोज तिवारी रेकॉर्ड मोडून निवडून येतील आणि दिल्लीतील साठी जागेवर आमचा विजय होईल.

हे ही वाचा:

चाय-बिस्कुटांनो आता तरी विश्वास ठेवाल?

राहुल गांधी यांनी जातीच्या आधारावर केलेल्या विधानाने न्यायव्यवस्थेला ओढले!

“पोलिसांनी पॉलीग्राफ चाचणी करावी म्हणजे सर्व चित्र स्पष्ट होईल”

डोंबिवली आगीची परिस्थिती नियंत्रणात, ४ मृत्यू!

दरम्यान, दिल्लीतील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चांगलेच तापले आहे. दिल्लीच्या ईशान्य मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मनोज तिवारी आणि इंडिया अलायन्स अंतर्गत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार आमनेसामने आहेत. अशा परिस्थितीत दिल्लीचा हा ईशान्य भाग इथल्या हॉट सीटपैकी एक आहे.देशाच्या सहाव्या टप्प्याचे मतदान शनिवारी (२५मे) पार पडणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
309,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा