29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषबिहारमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, सात पोलिसांसह ३० जखमी

बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, सात पोलिसांसह ३० जखमी

Google News Follow

Related

बिहारमध्ये छठ पूजा सुरु असताना मोठी दुर्घटना घडली आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन सात पोलिसांसह तीसजण जखमी झाले आहेत. यापैकी दहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवार, २८ ऑक्टोबरला रात्री उशिरा ही घटना घडली आहे.

बिहारमधील औरंगाबादमध्ये रात्री अडीच वाजता ही घटना घडली आहे. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साहेबगंज परिसरातील अनिल गोस्वामी यांच्या घरी छठ पूजा सुरू होती. घरातील सर्व लोक प्रसाद बनवण्यात व्यस्त होते. त्यावेळी अचानक गॅस गळतीमुळे आग लागली. यानंतर परिसरात आरडाओरड झाली आणि परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यास सुरुवात केली.

यावेळी गस्तीवर असलेले पोलिसांचे पथक याठिकाणी पोहचले. आग विझवण्यासाठी पोलिसांनी सिलेंडरवर पाणी टाकले असता त्याचा स्फोट झाला आणि दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पोलिसांसह तीसहून अधिक जण जखमी झाले आहेत. यापैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना उपचारांसाठी शहरात पाठवण्यास सांगितले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सामान्य आहे. त्याचबरोबर अशा प्रसंगी सावध राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केले आहे.

हे ही वाचा:

एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची चौकशी

राज्यात बसणार सायबर गुन्ह्यांना आळा

आता वैद्यकीय शिक्षण घेता येणार मराठीत

समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांची आमदारकी रद्द

महिला कॉन्स्टेबल प्रीती कुमारी, डीएपी अखिलेश कुमार, जगलाल प्रसाद सैफ, जवान मुकुंद राव जगलाल प्रसाद, ड्रायव्हर मोहम्मद मुअज्जम, साहेबगंज परिसरातील नगर परिषद अध्यक्षपदाचे उमेदवार अनिल ओडिया, राजीव कुमार, शबदीर, अस्लम, सुदर्शन, एरियन गोस्वामी, छोटू आलम, अनिल कुमार, शाहनवाज यांच्यासह तीसहून अधिक लोक जखमी झाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा