28 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरविशेषमुंबईतील कोळीवाडा पर्यटनाचे केंद्र ठरावे यासाठी शासन कटिबद्ध

मुंबईतील कोळीवाडा पर्यटनाचे केंद्र ठरावे यासाठी शासन कटिबद्ध

पालकमंत्री दीपक केसरकर यांची भावना

Google News Follow

Related

मुंबईतील कोळीवाडा हे पर्यटनाचे केंद्र ठरावे, यासाठी शासन कटिबबद्ध असून त्यांच्या विकासासाठी आगामी काळात विविध योजना आणि प्रकल्प राबविले जातील, अशी भावना शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. माहीम कोळीवाडा येथील जिल्हा विकास नियोजन निधीमधून पालकमंत्री केसरकर यांच्या संकल्पनेतून पालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर,  उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आदी उपस्थित होते.

कोळी बांधवांचा व महिलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून महिला बचत गटामार्फत चालविण्यात येणार्‍या पहिल्या सी-फूड प्लाझाचे तसेच वरळी येथील ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे लोकार्पण पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केले. कोळी भगिनींनी बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांचा त्यांनी आस्वाद घेतला. सी फूड प्लाझामध्ये येणार्‍या नागरिकांना खास कोळी फूडचा आनंद घेता यावा, यासाठी समुद्रकिनारी तंबूंची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी नागरिकांना कोळी खाद्यपदार्थांसोबत कोळी नृत्याचाही आनंद घेता येणार आहे.

हेही वाचा.. 

जम्मू-काश्मीरमधील लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या लश्करच्या कमांडरचा शिरच्छेद!

रश्मिकाच्या समर्थनार्थ अभिनेते सरसावले!

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात सिरियाचा हात

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना सिद्धिविनायक पावला!

दरम्यान, पालकमंत्री केसरकर यांनी पालिकेच्या जी उत्तर विभागातील विविध स्थळांची तसेच कामांची पाहणी केली. श्री सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेऊन मंदिर परिसराची पाहणी केली व प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. त्यानंतर भागोजी कीर स्मशानभूमी, दादर चौपाटी, माहीम पोलीस स्थानक, हिंदुजा रुग्णालय येथील चौपाटी, धोटे उद्यान, माहीम परिसर येथील राम मंदीर, दादर येथील गणेश उद्यान, दादर जलतरण तलाव, नाना-नानी उद्यान, वीर नरिमन नगर, प्रभादेवी चौपाटी, माई मंगेशकर मुलांचे उद्यान यासोबतच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले आर. के. इमारत येथील कामांची पाहणी केली. तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्यांबाबतही चर्चा केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा