27 C
Mumbai
Monday, September 16, 2024
घरविशेषशिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना सिद्धिविनायक पावला!

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना सिद्धिविनायक पावला!

सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी सरवणकर यांची निवड

Google News Follow

Related

सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याअगोदर ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष होते.यापदी आता शिंदे गटाचे सदा सरवणकर यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेनेचे माहिम दादर विधानसभेचे आमदार सदा सरवणकर यांची मंत्रीपदाची संधी हुकली होती.त्यानंतर सरवणकर यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा देखील होती.अखेर सदा सरवणकर यांना सिद्धिविनायक पावला असून सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यात आली आहे.

श्री सिध्दीविनायक न्यासाच्या विद्यमान कार्यकारणीचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आला होता.या कार्यकारणीची कालावधी जुलै २०२३ मध्येच संपुष्टात आला होता.या न्यासाच्या अध्यक्षपदी सध्या उबाठा शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांची नियुक्ती झाली होती, तर कोषाध्यक्ष म्हणून संजय सावंत होते. तर विश्वस्त म्हणून विशाखा राऊत, सुबोध आचार्य, वैशाली पाटणकर, आरती साळवी,सुनील पालवे, सुनील गिरी,राजाराम देशमुख, भास्कर शेट्टी, श्वेता अवर्सेकर आदींचा समावेश होता.त्यानंतर आता सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान स्फोट

नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात आठ हजार घरांचे नुकसान!

जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!

भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त

शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे सदा सरवणकर यांनी नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि आमदार, विभागप्रमुख अशी महत्वाची पदे त्यांनी भुषवली आहेत.सन १९९२ ते २००७ पर्यंत ते नगरसेवक होते, तर २००४मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ते दादरमधून आमदार म्हणून प्रथम निवडून आले. त्यानंतर झालेल्या २००९च्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून आदेश बांदेकर यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे सदा सरवणकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली.

या निवडणुकीत मनसेचे नितीन सरदेसाई यांनी बाजी मारली.त्यानंतर २०१२मध्ये काँग्रेसमध्ये मन रमत नसल्याचे कारण देत सदा सरवणकर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेना पक्षाकडून त्यांना विभागप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.त्यानंतर सन २०१४ व त्यानंतर २०१९ मध्ये ते सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.त्यानंतर आता जुलै २०२२मध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडले.त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटामध्ये सदा सरवणकर सामील आहेत.

 

 

 

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा