गुजरात विद्यापीठात नमाजाच्या वेळी परदेशी मुस्लिम विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत आता कुलगुरुंची प्रतिक्रिया समोर आली आहे.मागील आठवड्यात शनिवारी परदेशी मुस्लिम विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामागे नमाज हे कारण असू शकत नाही, असे कुलगुरू नीरजा गुप्ता यांनी म्हटले आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, कुलगुरू नीरजा गुप्ता यांनी सांगितले की, परदेशी विद्यार्थ्यांकडून स्थानिक संस्कृतीकडे दुर्लक्ष करणे हा देखील वादाचा मुद्दा असू शकतो.त्यांनी दावा केला की, परदेशी विद्यार्थी वसतिगृहात मांसाहारी जेवण जेवत आणि उरलेले अन्न उघड्यावर फेकत असत.गुजरात मधील राहणाऱ्या शाकाहारी समाजाला हे पटले नसावे म्हणून कदाचित हा वाद झाला असावा.त्यामुळे परदेशी मुस्लिम विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामागे नमाज हे कारण असू शकत नाही, असे कुलगुरू नीरजा गुप्ता यांनी म्हटले.
हे ही वाचा:
शरियत कायदा-बहुविवाहच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार
मादी चित्ता गामिनीने पाच नव्हे सहा बछड्यांना दिला जन्म
निवडणूक रोख्यांच्या माहितीचा गैरवापर करण्याविरोधात यंत्रणा नाही!
हिमाचल प्रदेशात काँग्रेसची डोकेदुखी वाढली!
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना कुलगुरूंनी परदेशी विद्यार्थ्यांना संवेदनशील करून त्यांना स्थानिक संस्कृती आणि श्रद्धा यांची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे सांगितले.
दरम्यान, मागील आठवड्यात शनिवारी विद्यापीठाच्या वसतिगृहात झालेल्या मारहाणीनंतर गुजरात पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे.अहमदाबाद पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दंगल, मालमत्तेचे नुकसान, घुसखोरी, गुन्हेगारी केल्याबद्दल सुमारे २५ अज्ञातांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.