30 C
Mumbai
Sunday, September 19, 2021
घरविशेषरत्नागिरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

रत्नागिरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Related

गेले चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार बसरणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. शिवाय, प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झाली आहे. वरुण राजा काही काळ विश्रांती घेतो आणि त्यानंतर पुन्हा बरसायला सुरुवात करतो. सद्यस्थितीत परिस्थिती पाहता काही भागांमध्ये पावसानं अल्पकालावधीकरता विश्रांती घेतली आहे. पण, वातावरण मात्र पावसाकरता पुरक असून आगामी काळात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

खाडी किनारच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्राला देखील उधाण येत असल्यानं किनारपट्टीवरील नागरिकांना देखील त्याबाबतच्या सूचना दिल्या गेला आहेत. आगामी आणखी चार दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ५ जून रोजी मान्सूनचं कोकणात आगमन झालं. पण, त्यानंतर १० जूनपर्यंत पावसाचा पत्ता नव्हता केवळ पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. त्यानंतर ११ जूननंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू लागला. पण, हा पाऊस सरींवर होता. अखेर १३ जूननंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत गेला. आज घडीला जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती आहे.

हे ही वाचा :

उद्धव ठाकरेंचे सरकार हे गुंड सरकार

तुमचा उद्धव मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे

कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येने गाठला ७१ दिवसांचा निचांक

शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा

खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी सध्या ५.१० मीटर आहे. याच नदीची इशारा पातळी ६ मीटर तर धोका पातळी ७ मीटर आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीची सध्याची पाणी पातळी ३.६० मीटर आहे. तर, याच नदीची इशारा पातळी ५ मीटर असून धोका पातळी ७ मीटर आहे. लांजा तालुक्यातील काजळी नदीची सद्याची पाणी पातळी १३.६३ मीटर असून काजळी नदीची इशारा पातळी १६.५ तर धोका पातळी १८ मीटर आहे. राजापुरातील कोदवली नदीची सध्याची पातळी ४.३० मीटर आहे. तर याच कोदवली नदीची इशारा पातळी ४.९ मीटर असून धोका पातळी ८.१३ मीटर आहे. संगमेश्वर तालुक्यात शास्त्री, सोनवी आणि बावनदी या मुख्य नद्या आहेत. त्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. शास्त्री नदी सध्या ४.६० मीटरवरून वाहत आहे. शास्त्री नदीची इशारा पातळी ६.२ मीटर तर धोका पातळी ७.८ मीटर आहे. सोनवी नदीची सध्याची पाणी पातळी ४.४० मीटर आहे. याच नदीची इशारा पातळी ७.२ मीटर असून धोका पातळी ८.६ मीटर आहे. बावनदीची धोका पातळी ११ मीटर असून इशारा पातळी ९.४ मीटर आहे. सद्यस्थितीत या नदीची पाणी पातळी ५.७५ मीटर आहे. तर, लांजामधील मुचकुंदी नदी सध्या १.८० मीटरवरून वाहत आहे. मुचकुंदीची इशारा पातळी ३.५ मीटर असून धोका पातळी ४.५ मीटर आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा