22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
घरविशेषमुसळधार पावसामुळे दिल्ली जलमय; दिल्लीत चार मुलांसह सहा जण बुडाले

मुसळधार पावसामुळे दिल्ली जलमय; दिल्लीत चार मुलांसह सहा जण बुडाले

मुले आंघोळ करत असताना बुडाल्याचा अंदाज

Google News Follow

Related

नवी दिल्लीत संततधार पावसामुळे घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये एक वृद्ध, एक तरुण आणि चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारीदेखील शहराच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहिल्यानंतर २४ तासांहून अधिक काळ पाण्याखाली गेलेल्या दिल्लीच्या ओखला येथील अंडरपासमध्ये बुडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

दिग्विजय कुमार चौधरी असे या वृद्धाचे नाव असून तो दिल्लीतील जैतपूरचा रहिवासी आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ओखला इंडस्ट्रिअल एरिया पोलिस ठाण्याला फोन आल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक तपासानुसार, दिग्विजय हे त्यांच्या स्कूटरने पाण्याने भरलेल्या अंडरपासमध्ये गेले होते, तेव्हा ही घटना घडली.
शनिवारी दुपारी आऊटर उत्तर दिल्लीतील समयपूर बदली भागात एका अंडरपासच्या पाण्यात बुडून दोन मुले मरण पावली. मेट्रोजवळील सिरासपूर अंडरपासजवळ ही घटना घडली असून, येथे सुमारे अडीच ते तीन फूट पाणी तुंबले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आज दुपारी २.२५च्या सुमारास दोन मुले बुडाल्याची माहिती कळताच पोलिसांनी तत्काळ तिथे धाव घेतली. घटनास्थळी तातडीने एक पथक रवाना करण्यात आले आणि त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली. नंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ही मुले आंघोळ करत असताना बुडाली असावीत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शुक्रवारीही ईशान्य दिल्लीत पावसाच्या पाण्याने भरलेल्या खंदकात खेळत असताना आठ आणि १० वर्षे वयोगटातील दोन मुले बुडाली, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

‘सूर्या’ने झेल पकडला; भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला!

इटलीत तीन जणांनी इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यकारी संचालकाची बॅग लांबवली

लडाखमध्ये रणगाडा सरावावेळी भारतीय सैन्याच्या पाच जवानांना हौतात्म्य !

भाजप सर्व सहकारी पक्षांना बरोबर घेऊन आत्मविश्वासाने निवडणूक लढणार

पावसामुळे पाण्याने भरलेल्या न्यू उस्मानपूर परिसरातील पुस्ता क्रमांक पाच जवळील पाच फूट खोल खड्ड्यात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मुलांची सुटका केली, परंतु रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

उत्तर-पश्चिम दिल्लीच्या शालीमार बाग भागातील पूरग्रस्त अंडरपासमध्ये २० वर्षीय एक व्यक्ती बुडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती आझादपूर मंडी येथे अर्धवेळ मजुराचे काम करत होता. मात्र त्याची ओळख पटलेली नाही. पावसाच्या प्रकोपाने शुक्रवारी दिल्लीत कहर केला. या दिवशी शहरात ८८ वर्षांतील जून महिन्यातील एक दिवसातील सर्वाधिक पाऊस होऊन अवघे दिल्ली शहर जलमय झाले होते अन् प्रवासी रस्त्यावर अडकून पडले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा