29.6 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरविशेषपरतीच्या पावसाची राज्यासह मुंबईत दमदार हजेरी, मुंबईला येलो अलर्ट जारी

परतीच्या पावसाची राज्यासह मुंबईत दमदार हजेरी, मुंबईला येलो अलर्ट जारी

आज ८ ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Google News Follow

राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून शुक्रवार, ७ ऑक्टोबर रोजी पावसाने मुंबईसह राज्यात दमदार हजेरी लावली. परतीचा पाऊस पुढचे दोन ते तीन दिवस आणखी हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर आज ८ ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढचे काही दिवस पावसाच्या मध्यम किंवा हलक्या सरी बरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कालपासून पावसाने मुंबई आणि उपनगरांमध्ये हजेरी लावली असून रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.

परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सोयाबीन आणि कापसाला मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी सोयाबीनची काढणी झाली होती, तर काही ठिकाणी सोयाबीन काढायचे बाकी होते, अशा स्थितीत पाऊस आल्याने शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.

हे ही वाचा:

बसला आग लागून दहा जणांचा मृत्यू, सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

सिरीज पाहून बँक मॅनेजरनेच केली बँकेत चोरी

भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

राज्यातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, लातूर या जिल्ह्यांना देखील पावसानं झोडपून काढलं आहे. दरम्यान १० ऑक्टोबरनंतरच मान्सून निघून जाईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा