28.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरविशेष“हिंदुस्तानी जीव घेणारे नाही, जीव वाचवणारे”

“हिंदुस्तानी जीव घेणारे नाही, जीव वाचवणारे”

स्मित यांच्या धैर्याचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक

Google News Follow

Related

फ्लायदुबईच्या विमानात कॉकपिटमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर प्रसंगावधान राखत प्रवाशांचा जीव वाचवणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित माछर यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी स्मित यांच्या धैर्याचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक करत त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या संस्कारांचाही विशेष उल्लेख केला.

संवादाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी यांनी स्मित यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. “संपूर्ण देश तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू आहे,” असे मोदी यांनी सांगितले. जखमी अवस्थेतही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी स्मित यांचे कौतुक केले. “तुमच्या हिंमतीने, धैर्याने आणि प्रसंगावधानाने इतक्या लोकांचा जीव वाचवला,” असे मोदी म्हणाले. शरीरावर जखमा झाल्या असतानाही स्मित यांनी परिस्थितीचा सामना केला आणि प्रवाशांच्या जीवाची काळजी घेतली, याचा उल्लेख करत मोदी यांनी त्यांच्या धैर्याला सलाम केला.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्मित यांच्या धैर्याचे कौतुक करताना म्हटले की, “आज देश गर्वाने म्हणेल की, आम्ही हिंदुस्तानी जीव घेणारे नाही, तर जीव वाचवणारे आहोत,” असे ते म्हणाले. स्मित यांच्या कृतीमुळे सर्व भारतीयांचा सन्मान वाढल्याचेही मोदी यांनी नमूद केले. संवादादरम्यान मोदी यांनी स्मित यांच्या आई गीताबेन यांचाही विशेष उल्लेख केला. “काल मला भूपेंद्र भाई आणि गीताबेन यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. मी गीताबेन यांना सांगितले की, तुमचे नाव गीता आहे; पण तुम्ही कृष्णाची गीता पूर्णपणे वाचवली. तुम्ही स्मितचे जीवन गीतेच्याच मूल्यांनी घडवले,” असे मोदी म्हणाले.

स्मित माछर यांनी संवादादरम्यान भावूक झाल्याबद्दल पंतप्रधानांची माफी मागितली. त्यावर मोदी यांनी, “माझ्यासमोर भावूक नाही होणार तर कुठे होणार?” असे म्हणत त्यांना धीर दिला. स्मित यांनी हल्ल्याच्या वेळी हनुमान चालीसा म्हणत असल्याचा उल्लेख केल्यानंतर मोदी यांनी त्यांच्या आईच्या संस्कारांचाही गौरव केला. “हनुमान चालीसाची गोष्ट ऐकून मी तुमच्या आई गीता यांना प्रणाम करतो. त्यांनी तुम्हाला असे संस्कार दिले,” असे मोदी म्हणाले. स्मित यांच्या पत्नी सोनल यांच्याशी झालेल्या संवादाचाही मोदी यांनी उल्लेख केला. संकटाच्या प्रसंगीही त्या मोठ्या हिंमतीने आणि संयमाने बोलत असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

फ्लाय दुबईचा ‘तो’ हल्लेखोर वैमानिक जिहादी विचारसरणीचा

राहुल गांधींनी गौरवलेल्या ‘मोहम्मद दीपक’ला धमकी प्रकरणी अटक

कलिनिनग्राडवर हल्ला झाल्यास अण्वस्त्रांसह पलटवार

फ्लायदुबई हल्ल्यात इराणचा संबंध असल्यास…

“स्मित, तुम्ही इतके महान काम केले आहे की, केवळ देशवासीच नाही तर जगातील लोकही तुमच्याशी बोलायला उत्सुक आहेत,” असे मोदी म्हणाले. या घटनेत स्मित यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे भारतीय वैमानिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरल्याचे त्यांनी नमूद केले. “अहिंसा काय असते, हे तुम्ही जगून दाखवले आहे,” असेही मोदी यांनी यावेळी म्हटले. तसेच भारत स्मित माछर यांच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचे सांगत, “जेव्हा गरज असेल तेव्हा फोन करा,” असे आश्वासनही त्यांनी दिले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा