एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी आज (२९ सप्टेंबर) कोल्हापुरात दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्या या कोल्हापूर दौऱ्याला विरोध होताना दिसत आहे. कोल्हापूरच्या बागल चौकात ओवैसी येणार असल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी ओवैसी यांना विरोध केला. खरेतर, बागल चौकात पक्षाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाला ओवैसी याठिकाणी येणार होते. मात्र, हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी एकत्रित जमून त्यांना विरोध केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैन्यात करण्यात आला आहे.
एबीपी माझाच्या बातमीनुसार, असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. असदुद्दीन ओवैसी हे पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये आले आहेत. यापूर्वी त्यांनी विशाळ गडच्या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांना त्यांना कोल्हापुरात येवू दिलं नव्हतं. यानंतर ते आता कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत.
हे ही वाचा :
मेलोनी यांच्या आत्मचरित्राच्या भारतीय आवृत्तीची नरेंद्र मोदींनी लिहिली प्रस्तावना
अहिल्यानगरात ‘आय लव्ह मोहम्मद’च्या रांगोळीवरून तणाव; मुस्लिमांचा रास्तारोको, दगडफेक!
फरार शातिर ठगाला जम्मू-कश्मीरच्या सोपोरमध्ये अटक
पोटासाठीच नाही, ‘इम्युनिटी बूस्टर’सुद्धा आहे ‘पंचकोल’
बागल चौकातील पक्षाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार होते. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्याठिकाणी जमून ओवैसी यांना विरोध केला. कारण ओवैसी बंधू हे नेहमी भडकाऊ भाषणे देत असतात. आणि त्यामुळे कोल्हापुरातील शांतात भंग होवू नये यासाठी हा विरोध असल्याचे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, ओवैसी यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांची इचलकरंजीत सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.







