मुंबईत सुरू असलेल्या गणेशोत्सव दरम्यान लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री शुक्रवारी मुंबईत दाखल होणार असून दुसरीकडे मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्यामुळे मुंबई पोलिसांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनासाठी आझाद मैदान येथे दीड हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.
मुंबईत गणेशोत्सवाची धूम सुरू असताना मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात शुक्रवारी उपोषणाला बसणार आहे. गुरुवारी रात्रीच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हजारोच्या संख्येने आझाद मैदानात दाखल होणार आहे. दरम्यान शुक्रवारी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील लालबागचा राजा मंडळाला भेट देऊन लालबागच्या राजा चे दर्शन घेणार आहे. एकीकडे गणेशोत्सव बंदोबस्त, दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवारी मुंबईत येणार असल्यामुळे मुंबई पोलिसांनी चांगलीच तारांबळ उडणार असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा:
“गुजरातला पुरस्कार राजीव गांधी फाउंडेशनने दिला, राहुल गांधींनी आईला विचारावं”
‘ट्रम्पचा टॅरिफ’: उद्योगावर तात्पुरता ताण, सरकारकडून दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू!
भारताला गुंतवणूक व नवोन्मेष केंद्र म्हणून पहावे
विद्यार्थिनीच्या मृत्यूवरून गोंधळ
शुक्रवार हा मुंबई पोलिसांसाठी परीक्षेचा दिवस असणार आहे, दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनासाठी आझाद मैदान येथे दीड हजार पोलीस बंदोबस्त कामी तैनात करण्यात आले आहे, त्यात २ अतिरिक्त पोलीस आयुक्त ६ पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी २०० सहाय्यक पोलीस आयुक्त,पोलीस निरीक्षक आणि १३०० पोलीस कर्मचारी यांचा समावेश असेल.







