25 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेषहार्दिक पंड्याची घरवापसी; पुन्हा मुंबई इंडियन्सकडून खेळणार आयपीएल

हार्दिक पंड्याची घरवापसी; पुन्हा मुंबई इंडियन्सकडून खेळणार आयपीएल

शुभमन गिलकडे गुजरात टायटन्स संघाची धुरा

Google News Follow

Related

सध्या आगामी आयपीएल स्पर्धेची जोरदार चर्चा सुरू आहे. कोणत्या संघाने कोणते खेळाडू संघात ठेवले आणि कोणत्या खेळाडूंना डच्चू दिला याची चर्चा सुरू असताना सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या परत एकदा मुंबई इंडियन्स संघामध्ये परतला आहे.

रविवारी सर्व संघांनी खेळाडू रिटेन आणि रिलीज केले होते. पंड्याला गुजरात संघाने रिलीज केलं नव्हतं, मात्र सोशल मीडियावर हार्दिक मुंबईतून खेळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मुंबईच्या संघाने हार्दिकला ट्रेड करत संघात घेतलं आहे. सोमवार, २७ नोव्हेंबर स्वत: हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सने याबाबत ऑफिशियल अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

हार्दिक पंड्या याधीही मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. गुजरात संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेत थेट कर्णधार केल होतं. हार्दिकने त्याच्या कर्णधार पदाच्या पहिल्या सीझनमध्ये संघाला ट्रॉफी मिळवून दिलेली, दुसऱ्या पर्वामध्येही संघाने त्याच्या नेतृत्वाखाली थेट फायनलमध्ये धडक मारली होती. मुंबईने थेट कर्णधाराला ट्रेड करत आपल्या संघात परत एकदा घेतलं आहे. त्यामुळे आयपीएलमधला सर्वात मोठा ट्रेड असल्याचे बोलले जात आहे. मुंबईच्या संघाने कॅमेरून ग्रीनला आरसीबीला म्हणजेच बंगळूरू संघाला दिले आहे. हार्दिकला घेऊन आरसीबीला ग्रीन दिला त्यामुळे पर्समध्ये २.२५ कोटी आल्याने मुंबईकडे लिलावासाठी आता एकूण १७.५० कोटी झाले आहेत.

२०१५ च्या ऑक्शनमध्ये हार्दिक पंड्याला बेस प्राईजमध्ये १० लाख रुपयात मुंबई इंडियन्सने विकत घेतलं होतं. त्यानंतर या खेळाडूने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर सर्वांना आपली ओळख दाखवून दिली होती.

दरम्यान, हार्दिक पंड्याला घेण्यामाागे मोठा मास्टरप्लॅन असावा. रोहितनंतर हार्दिक पंड्याकडे संघाच्या नेतृत्व धुरा सोपवण्याच्या उद्देशाने इतकी मोठी रक्कम मुंबईने मोजली असावी, अशा चर्चा आहेत.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशात बारावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करत तोंडावर केली लघुशंका!

नागपुरात होमगार्डनेचं तरुणांना मारहाण करत लुटले १० हजार

अमेरिकेतील भारतीय राजदूताला खलिस्तानी समर्थकांची धक्काबुक्की!

हमासकडून तिसऱ्या टप्प्यात १४ इस्रायली, ३ थाई नागरिकांसह १७ ओलिसांची सुटका!

शुभमन गिलकडे गुजरात टायटन्स संघाची धुरा

धडाकेबाज सलामीवीर शुभमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्स संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात परतल्यानंतर गुजरातच्या संघाची धुरा युवा क्रिकेटपटू शुभमन गिल सांभाळणार आहे. गुजरात टायटन्स संघाकडून याची अधिकृत घोषणा केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा