28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषमोदींच्या तुलनेत राहुल गांधींचे उत्पन्न प्रचंड

मोदींच्या तुलनेत राहुल गांधींचे उत्पन्न प्रचंड

Google News Follow

Related

मंगळवार, १४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे केवळ तीन कोटी रुपये व्यक्तिगत मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडे रोख ५२ हजार ९२० आणि ३.०२ कोटी जंगम मालमात्तेमध्ये गुंतवण्यात आले आहेत. त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता, घर किंवा भूखंड नाही जो ‘अचल मालमत्ता’ या श्रेणीत येतो. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून आले आहे.

प्रतिज्ञापत्र म्हटले आहे की, मोदींचे करपात्र उत्पन्न २०१८-१९ या आर्थिक वर्षात ११ लाख रुपयांवरून २०२२-२३ मध्ये २३.५ लाख इतके वाढले आहे. मोदी यांच्याकडे एसबीआयमध्ये २ कोटी ८५ लाख ३३८ रुपयांची मुदत ठेव आहे. पंतप्रधानांकडे २ लाख ६७ हजार ७५० रुपयांच्या ४५ ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. एसबीआयच्या गांधीनगर शाखेत ७३ हजार ३०४ रुपये आणि वाराणसी शाखेत ७ हजार रुपये असल्याचे जाहीर केले आहे. याव्यतिरिक्त त्यांच्या नावाखाली कोणतेही थकित कर्ज किंवा थकबाकी नाही. त्यांच्याकडे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये ९.१२ लाख रुपये जमा आहेत. पंतप्रधान मोदी यांनी १९६७ मध्ये एसएससी पूर्ण केले. १९७८ मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीए आणि १९८३ मध्ये गुजरात विद्यापीठातून एमए पदवी मिळवली.

हे ही वाचा..

‘वीर सावरकरांची निंदा करणाऱ्यांना नकली शिवसेनेकडून डोक्यावर घेऊन नाचण्याचे काम’

घाटकोपरमधील होर्डिग प्रकरण: भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात

अटल सेतूवरून जाताना ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंधाना म्हणते, भारत रुकेगा नही!

उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ योगी आएंगे आएंगे योगी आएंगे

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी गुजरातमधील गांधीनगरमधील निवासी जागेसह २.५ कोटी रुपयांची मालमत्ता, मुदत ठेवींमध्ये १.२७ कोटी रुपये आणि रोख ३८ हजार ७५० रुपये जाहीर केले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी एकूण १.६५ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. अदानी-अंबानींसोबतच्या घनिष्ट संबंधांमुळे पंतप्रधान मोदी करोडोंची कमाई करतात, असा राहुल गांधींचा दावा आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या अब्जाधीश भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि अंबानी यांच्याशी असलेल्या कथित संबंधांवर वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. अलीकडेच ८ मे रोजी राहुल गांधी यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदींना अदानी आणि अंबानींनी कथितपणे उचलले आहे. अदानी आणि अंबानींमुळे गांधींना यापूर्वी फायदा झाला असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान केला होता.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी असाही दावा केला की विरोधी पक्षांना अंबानी आणि अदानी यांच्याकडून बेकायदेशीर निधी मिळत आहे आणि त्यामुळे त्यांनी अब्जाधीशांवर चर्चा करणे बंद केले आहे.

“पाच वर्षे तुम्ही अंबानी आणि अदानी यांचे नाव घेऊन बोलत होता आणि आता अचानकपणे ते सगळे थांबले आहे, असे तेलंगणामध्ये बोलताना मोदी म्हणाले होते.

राहुल गांधी यांच्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची श्रीमंती जाहीर झाली आहे. त्यांच्या मालमत्तेचे मूल्य ३५८३ टक्के वाढले आहे. विशेष म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी केरळच्या वायनाडमधून उमेदवारी दाखल करताना काँग्रेसचे राहुल गांधी यांनीही त्यांचे शपथपत्र निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केले होते. या प्रतिज्ञापत्रात असे दिसून आले आहे की, गेल्या पाच वर्षांत त्यांच्या मालमत्तेत २८ टक्के पेक्षा जास्त वाढून २०१९ मध्ये १५ कोटींवरून २०२४ मध्ये २० कोटीपेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे गांधी हे गेल्या ५ वर्षात ६ कोटीने श्रीमंत झाले आहेत.

राहुल गांधी यांचे २०२२-२३ मध्ये वार्षिक उत्पन्न १.०२ कोटी रुपये होते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न नरेंद्र मोदी यांच्या उत्पनाच्या चार पट आहे. गांधींच्या निम्म्याहून अधिक मालमत्ता ही जमीन आणि व्यावसायिक इमारतींसह स्थावर मालमत्ता आहेत. त्याचे सध्याचे मूल्य ११,१५,०२,५९८ रुपये आहे. त्यांची जंगम मालमत्ता ९,२४,५९,२६४ रुपये आहे आणि त्यापैकी बहुतांश शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आहेत. त्याच्याकडे २५ कंपन्यांचे शेअर्स आहेत आणि त्यापैकी अनेक ब्लू चिप स्टॉक्स आहेत जसे की एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, इन्फोसिस, नेस्ले, टीसीएस, ब्रिटानिया इ. त्याच्या शेअर्सचे मूल्य ४.३४ कोटी रुपये आहे.

हातात रोख रक्कम, बँकेत आणि इतर काही मालमत्तेसह, त्याच्या जंगम मालमत्तेचे एकूण मूल्य ९ कोटी २४,५९,२६४ रुपये आहे. २०१४ मध्ये हे उत्पन्न ५ कोटी ८०,५८,७७९ रुपये होते. याचा अर्थ त्याच्या जंगम मालमत्तेचे मूल्य , मुख्यतः शेअर्स आणि म्युच्युअल फंड, तब्बल ६० टक्क्यांनी वाढले आहे. गांधी यांच्या गेल्या २० वर्षांत त्यांच्या एकूण घोषित मालमत्तेच्या मूल्यात प्रचंड वाढ झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा