28 C
Mumbai
Friday, March 6, 2026
घरविशेष"मी टोकियोची चायवाली तुम्ही भारताचे चायवाले''

“मी टोकियोची चायवाली तुम्ही भारताचे चायवाले”

पंतप्रधान मोदींच्या जपान भेटीदरम्यान भारतीय वंशाच्या चहाविक्रेत्याने व्यक्त केल्या भावना

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जपानमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी भारतीय वंशातील अनेक जण उत्साहाने उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जपानमधील कलाकारांनी भारतीय संस्कृतीवर आधारित विविध सांस्कृतिक नृत्य सादर केले. तसेच पारंपरिक जपानी कलांचे देखील सादरीकरण करण्यात आले. मोदींनी हा सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थित राहून अनुभवला आणि कलाकारांचे कौतुकही केले.

या स्वागताद्वारे भारतीय आणि जपानी संस्कृतीतील मैत्रीचे प्रतीक अधोरेखित झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर टोकियोत राहणाऱ्या एका भारतीय नागरिकाने आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, त्या जपानमध्ये चहा विक्रीचे काम करतात आणि यावेळी पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बेला चंद्रानी असे या भारतीय महिलेचे नाव आहे. एएनआयशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, मी १९७७ मध्ये जपानमध्ये आली असून मला याठिकाणी ४७ वर्ष झाली आहेत. माझं मूळ गाव आसाममधलं आहे आणि चहा म्हणजे काय? हे येथील लोकांना माहिती नव्हते. त्यामुळे मी माझ्या भारताचा चहा विक्री करण्याचा विचार केला आणि मागील ४२ वर्षांपासून येथे चहा विकते आहे. पंतप्रधान मोदींना मी आता तिसऱ्यांदा भेटणार आहे, हिरोशिमामध्ये आमची चांगली भेट झाली होती.

हे ही वाचा : 

ममता बॅनर्जीं भाषावाद करतायेत, मतदार यादीत रोहिंग्या, घुसखोर अन मृतांची नावे!

“पंतप्रधान, मुख्यमंत्री, न्यायाधीश यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा अधिकार नाही”

“माफी न मागितल्यास जनता काँग्रेसमुक्त भारत करेल”

भारत आधीच हिंदू राष्ट्र आहे, त्याला कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही: मोहन भागवत

त्या पुढे म्हणाल्या, ‘टोकियो चायवाली’ (TOKYO CHAI WALI) नामक बॅच छातीवर लावून त्यावेळी त्यांना भेटली होती. त्यावेळी मी त्यांना माझा बॅच दाखवत म्हणाले की ”मी टोकियोची चायवाली तर तुम्ही भारताचे चायवाले होते.” अशी आमची भेट होती. पंतप्रधान मोदींना भेटून खूप छान वाटते. आम्हाला पंतप्रधान मोदी वारंवार जपानला यावेत असं वाटतं. त्यांच्या भेटीमुळे आम्हाला भारताशी जोडलेले असल्याचं जास्त ठळकपणे जाणवतं.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा