उत्तर प्रदेशाच्या बदायूत दोन दिवसांपूर्वी दोन चिमुकल्यांनी हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मंगळवारी (१९मार्च) सायंकाळी ही घटना घडली होती.या हत्याकांडातील मुख्य आरोपी साजिद पोलिसांच्या चकमकीत ठार झाला होता.या घटनेनंतर आरोपीचा भाऊ जावेद हा फरार होता.पोलिसांची पथके त्याच्या शोधावर होती.अखेर जावेदच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.चौकशीसाठी पोलसांनी जावेदसह त्याच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे.
आरोपी साजिदने बाबा कॉलनीत राहणारे कंत्राटदार विनोद ठाकूर यांची दोन मुले आयुष (१३) आणि आहान (६) यांची निर्घृण हत्या केल्यानंतर सर्वत्र परिसरात एकच खळबळ उडाली.त्यांचा तिसरा मुलगा पियुष हा देखील या घटनेत जखमी झाला.आरोपी साजिदने गुन्हा करून घटनास्थळावरून पळ काढला.पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर साजिदला घेरले आणि चकमकीत त्याला ठार केले.यानंतर त्याचा भाऊ जावेद फरार होता.
आरोपी जावेदवर पोलिसांनी २५ हजार रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं, शिवाय त्याचे फोटो देखील जागोजागी लावण्यात आले होते.दरम्यान, काही लोकांनी आरोपीला रिक्षात पाहिलं आणि त्याची माहिती पोलिसांना दिली. रिक्षातून प्रवास करताना स्थानिकांनी पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.पोलिसांच्या ताब्यात देण्याआगोदर लोकांनी रिक्षामध्ये बसून आरोपीचा एक व्हिडीओ शूट केला.त्यामध्ये आरोपी निर्दोष असल्याचे सांगत आहे.
हे ही वाचा:
डीपफेक प्रकरणी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना हवीय घसघशीत नुकसान भरपाई!
“आमच्याकडे दोन रुपयेही नाहीत” बँक खाती गोठवल्यानंतर काँग्रेसची रडारड
चॅट जीपीटी म्हणतं, यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबईचा संघ चमकणार
केंद्राने रोहिंग्यांना राहण्याचा अधिकार नाकारला
आरोपी जावेद म्हणाला, जेव्हा लहान मुलांची हत्या झाली तेव्हा मी घटनास्थळी नव्हतो.त्यामुळे काय घडलं याची मला माहिती नाही.घडलेल्या प्रकारामुळे मी बिथरून गेलो होता.बाहेर प्रचंड गर्दी पाहून मी माझा जीव वाचवण्यासाठी तेथून पळून गेलो.मला सारखे फोन येत होते त्यामुळे मी घाबरून मोबाईल देखील बंद केला होता.
तो पुढे म्हणाला, साजिदचे पीडित कुटुंबाशी चांगले संबंध होते, मात्र त्याने असं का केलं काय घडलं मला काहीच माहिती नाही आणि त्याने जे काही कृत्य केलं त्यामध्ये माझा काहीही हात नाही.कृपया करून मला पोलिसांकडे घेऊन चला, अशी विनंती तो करत होता.बदायू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेदने गुरुवारी(२१ मार्च ) सकाळी बरेलीतील बारादरी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.पोलिसांचे पथक त्याला बदायूला घेऊन येत आहे.जावेदची चौकशी केल्यानंतरच हत्येचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.