परराष्ट्र मंत्र्यांना दिल्लीतल्या सुविधांची काळजी, म्हणाले-मला लाज वाटते!

आपवर निशाणा

परराष्ट्र मंत्र्यांना दिल्लीतल्या सुविधांची काळजी, म्हणाले-मला लाज वाटते!

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पंतप्रधान मोदींसह भाजपचे अनेक मंत्री आणि नेते दिल्लीच्या निवडणुकीच्या मैदानात प्रचारासाठी आले आहेत. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला आहे. मंत्री जयशंकर म्हणाले की,  राष्ट्रीय राजधानीतील लोकांना मूलभूत सुविधांची वानवा असल्याचे परदेशात कबूल करण्यास मला “लाज” वाटते. शनिवारी (१ फेब्रुवारी) जेएलएन स्टेडियममध्ये दक्षिण भारतीय समुदायाला संबोधित करताना मंत्री जयशंकर बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘पण मी एक गोष्ट लपवतो… मला सांगायला लाज वाटते की भारताच्या राजधानीत लोकांना घर, गॅस सिलिंडर आणि आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत नाही.’ आम आदमी पक्षाच्या सरकारने या केंद्रीय योजना दिल्लीत लागू केल्या नाहीत, असा दावा मंत्री जयशंकर यांनी केला.
भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांना दरमहा अडीच हजार रुपये, अटल कॅन्टीन, ७० वर्षांवरील वृद्धांसाठी मोफत उपचार अशी आश्वासने देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हमीखाली होईल. दिल्ली हे देशातील सर्वोत्तम गोष्टींचे मॉडेल असायला हवे होते. मात्र गेल्या १० वर्षांपासून या सर्व गोष्टींचा येथे तुटवडा आहे. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या सरकारपासून जनता मुक्त होईल, असे मंत्री जयशंकर म्हणाले.

वीज, पाणी, गॅस सिलिंडर, घर आणि आरोग्य हा तुमचे हक्क असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतील जनतेला गेल्या १० वर्षांत हे अधिकार मिळाले नाहीत. त्यामुळे हे सरकार सत्तेत राहायचे की नाही?, याचा निर्णय जनता ५ फेब्रुवारीला घेईल.

हे ही वाचा : 

अंबादास दानवेंनी बाळासाहेबांना चूक ठरवले!

मुंडे-अजितदादा दोघेही आरसा साफ करताय…

१२ लाख करमुक्त, एका दगडात तीन पक्षी

छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये आठ नक्षलवाद्यांचा खात्मा

दरम्यान, दिल्लीतील विधानसभेच्या सर्व ७० जागांवर ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल ८ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

Exit mobile version