उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या दम देण्याच्या मुडमध्ये दिसतायत. कोणी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला तर मकोका लावायला मी मागे पुढे पाहणार नाही, असा दम त्यांनी दिलेला आहे. बीड जिल्हा विकास आणि नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत अजित पवार यांचे हे विधान आहे. या बैठकीत आमदार आणि अधिकारी उपस्थित असतात. सवाल हा निर्माण होतो, की अजित पवारांनी हा दम नेमका कुणाला दिला?