30 C
Mumbai
Saturday, February 14, 2026
घरविशेषकुर्ला परिसरात गाड्यांवर जबरदस्तीने "I Love Mohammad" स्टिकर लावण्याचा प्रकार!

कुर्ला परिसरात गाड्यांवर जबरदस्तीने “I Love Mohammad” स्टिकर लावण्याचा प्रकार!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांची माहिती, घटनास्थळाला देणार भेट

Google News Follow

Related

मुंबईच्या कुर्ला परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, काही मुस्लीम गुंडांवर जबरदस्तीने गाड्या, ऑटोरिक्षा आणि दुचाकींवर “I Love Mohammad” असे स्टिकर लावत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकाराचा एक व्हिडीओ ‘गली न्यूज’ द्वारे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला असून, तो लाखो लोकांपर्यंत पोहोचला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक्सवर पोस्टकरत ही माहिती दिली.

या प्रकाराचा तीव्र निषेध करत आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यासाठी किरीट सोमय्या आज संध्याकाळी ५ वाजता कुर्ला परिसरातील संबंधित ठिकाणी जाणार असल्याचे जाहीर केले आहे. ते  म्हणाले, आज ३० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता कुर्ला LBS मार्ग, कुर्ला न्यायालयाजवळील न्यू इंडिया आझाद रेस्टॉरंटच्या परिसराची मी भेट घेणार आहे. या परिसरात जबरदस्तीने काही धर्मांध गुंडे”I Love Mohammad” चे स्टिकर ये-जा करणाऱ्या वाहनांवर स्कूटर, रिक्षा, कार यावर चिटकवत आहे. या संबंधात मी या परिसराची पाहणी करणार. “बघतो, माझ्या गाडीवर कोण स्टिकर चिटकवतो ते…”

हे ही वाचा :

विद्यार्थ्यांनी रचली जनरल- झेड शैली प्रमाणे निषेध करण्याची योजना; प्रकरण काय?

दिवाळीपूर्वी बळीराजाला नुकसानभरपाई मिळणार!

बोगस ‘आयएएस’ची दीडशे जणांना कोट्यवधींची ‘टोपी’!

अहिल्यानगर: ‘आय लव्ह मोहम्मद’ वाद, ३९ जणांना अटक, २०० जणांवर गुन्हा दाखल!

या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, धर्माच्या नावावर दहशत आणि दादागिरी सहन केली जाणार नाही, असा सूर अनेक नागरिकांमध्ये दिसत आहे. पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि कोणताही कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा