27 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरविशेष'मलाही विश्वचषक विजेत्यांसारखा सन्मान हवा!..'

‘मलाही विश्वचषक विजेत्यांसारखा सन्मान हवा!..’

दिग्गज बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीचा सरकारला साकडे

Google News Follow

Related

टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडियावर पैशांचा वर्षाव झाला. आयसीसीकडून भारताला बक्षिसाची भरघोस रक्कम मिळाली. पण त्यानंतर बीसीसीआयने स्वतंत्र बक्षीस जाहीर केले आणि मग राज्य सरकारांनेही त्यांच्यावतीने घोषणा केली. या सगळ्यादरम्यान थॉमस चषकासारखी मोठी स्पर्धेचा विजेता भारताचा दिग्गज बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीने सरकारवर मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याने म्हटले आहे की, ‘जर भारतीय क्रिकेटपटूंना इतका सन्मान मिळत असेल तर मलाही तेवढाच सन्मान मिळायला हवा.’ चिराग शेट्टीच्या मते थॉमस चषकासारखी मोठी स्पर्धा जिंकून त्यांनीही इतिहास रचलेला आहे.

खरं तर भारतीय संघाचा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरात जल्लोष झाला होता. रात्रभर क्रिकेटप्रेमी या विजयाचा जल्लोष करत राहिले. टीम इंडिया परतल्यानंतर मुंबईत विजय परेडचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लाखोंची गर्दी झाली होती. हाच सत्कार सोहळा वानखेडे स्टेडियमवरही पार पडला. स्टेडियमही पूर्णपणे खचाखच भरले होते.

चिराग शेट्टीच्या मते, जेव्हा भारताच्या क्रिकेटपटूंचा इतका सन्मान केला जात आहे. तेव्हा आम्हाला इतका सन्मान का मिळाला नाही. आम्ही थॉमस चषक जिंकला आहे. शेट्टी यांच्या मते, थॉमस चषकदेखील कोणत्याही विश्वचषकापेक्षा कमी नाही.

हेही वाचा :

आशिया चषकासाठी महिला टीम इंडियाची घोषणा; हरमनप्रीत कौरची कर्णधारपदी निवड

फॉर फ्युचर इंडिया संस्थेचे ३०० वे स्वच्छता अभियान

सिगारेट देण्यास नकार; डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण !

‘राजकीय दबावाला बळी पडू नका, योग्य कारवाई करा’

भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने २०२२ मध्ये इंडोनेशियाला पराभूत करून प्रथमच थॉमस चषकाचे विजेतेपद पटकावले होते. चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकी रेड्डी यांनी भारताला ऐतिहासिक यश मिळवून दिले होते. या विजयानंतर चिराग शेट्टीने शर्ट उतरवून स्टँडमध्ये फेकून जोरदार जल्लोष केला होता. चिराग शेट्टीने भारतासाठी बॅडमिंटनमध्ये अनेक पदके जिंकली आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा