भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी ९ जून रोजी आपल्या कार्यकाळाची ११ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने त्यांनी म्हटले की, त्यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात देशवासियांचे जीवन अधिक सुलभ झाले आहे. आपल्या या प्रवासाबद्दल विचार व्यक्त करताना पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले, “मागील ११ वर्षांमध्ये जनतेच्या जीवनात असंख्य सकारात्मक बदल घडून आले. लोकांच्या जीवनमानात मोठा सुधार झाला आहे.”
ते पुढे म्हणाले की, नमो अॅपद्वारे देशात घडलेल्या बदलांना एका नवीन पद्धतीने पाहता येते. यामध्ये इंटरअॅक्टिव गेम्स, क्विझ, सर्व्हे आणि इतर प्रेरणादायी स्वरूपांद्वारे माहिती मिळवता येते, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’वर २ मिनिटे ५५ सेकंदांचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला, ज्यात मागील ११ वर्षांतील देशाच्या प्रगतीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. त्यांनी लिहिले, “या ११ वर्षांमध्ये आमच्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू म्हणजे गरीब भाऊ-बहिणींचे आणि जनतेचे कल्याण सुनिश्चित करणे राहिले आहे. उज्ज्वला योजना असो, पीएम आवास, आयुष्मान भारत, भारतीय जनऔषधी केंद्रे किंवा पीएम किसान सन्मान निधी – या सर्व योजनांनी देशवासियांच्या आशांना नवे पंख दिले आहेत. आम्ही पूर्ण निष्ठेने आणि सेवाभावाने लोकांचे जीवन सुलभ करण्यासाठी प्रत्येक शक्य तो प्रयत्न केला आहे.”
हेही वाचा..
‘दलाल’ फेम दिग्दर्शक पार्थो घोष यांचे निधन
हरल्यानंतर राहुल गांधींचं बिनसत
पद्मश्री फूलबासन बाई म्हणतात मोदींनी महिलांचा सन्मान वाढवला
भारताने गेल्या ११ केली ‘कॅशलेस क्रांती’
२०१४ साली एनडीएला मिळालेल्या मोठ्या यशानंतर नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी प्रथमच भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली २०१९ आणि आता २०२४ मध्ये देखील एनडीएने पुन्हा सत्ता मिळवली. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तीन वेळा भारताचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी हे दुसरे नेते आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्णतेनिमित्त सर्व मंत्रालयेही मागील दशकातील आपापल्या यशस्वी उपक्रमांची माहिती सोशल मीडियावरून जनतेपर्यंत पोहोचवत आहेत.
