एका अलीकडील अहवालानुसार, चीनमध्ये असेंबल केलेल्या अमेरिकन स्मार्टफोन्सच्या शिपमेंटचा वाटा २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत ६१ टक्क्यांवरून २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत २५ टक्क्यांवर आला आहे. या घसरणीचा मोठा फायदा भारताला मिळाला आहे. रिसर्च फर्म कॅनालिस (जी आता ओमडिया या संस्थेचा भाग आहे) यांच्या म्हणण्यानुसार, “मेड-इन-इंडिया स्मार्टफोनच्या एकूण संख्येत वर्षभरात २४० टक्क्यांनी वाढ झाली असून आता अमेरिकेत आयात होणाऱ्या स्मार्टफोन्सपैकी ४४ टक्के भारतातून येतात. २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत हा आकडा केवळ १३ टक्के होता.
कॅनालिसचे प्रमुख विश्लेषक संयम चौरसिया म्हणाले, “भारत पहिल्यांदाच २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेतील विक्रीसाठी सर्वाधिक स्मार्टफोन निर्माण करणारा देश बनला आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि चीनमधील व्यापार अस्थिरता, आणि त्यातूनच ऍपलने आपली सप्लाय चेन भारतात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. ऍपलने ‘चायना प्लस वन’ धोरणाखाली गेल्या काही वर्षांत भारतात उत्पादन क्षमता वाढवली आहे आणि २०२५ पर्यंत भारतातून बहुतेक निर्यात अमेरिकी बाजारासाठीच केली जाणार आहे.
हेही वाचा..
‘पाकिस्तानने गुडघे टेकल्यामुळेच शस्त्रसंधी’
पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, तीनही दहशतवादी मारले!
नागकूपात दर्शनासाठी भाविकांची रांग
चौरसिया पुढे म्हणाले, “ऍपलने भारतात iPhone 16 सिरीजच्या प्रो मॉडेल्सचे उत्पादन आणि असेंबलिंग सुरू केली आहे, मात्र अमेरिकेतील प्रो मॉडेल्सच्या मागणीसाठी अद्याप ते चीनमधील उत्पादन केंद्रावर अवलंबून आहेत. सॅमसंग आणि मोटोरोला यांनीदेखील भारतातून अमेरिका बाजारासाठी आपला हिस्सा वाढवला आहे, मात्र त्यांचे उत्पादन ऍपलच्या तुलनेत कमी प्रमाणात आणि धीम्या गतीने होत आहे.
ऍपलप्रमाणे, मोटोरोलाचे मूळ उत्पादन केंद्र चीनमध्ये आहे, तर सॅमसंग मुख्यतः व्हिएतनाममधून स्मार्टफोन्स तयार करतो. २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेत स्मार्टफोन शिपमेंटमध्ये १ टक्क्यांची वाढ झाली, कारण टॅरिफबाबतची चिंता असतानाही विक्रेत्यांनी आपला स्टॉक पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. चीनबरोबरच्या अनिश्चित वाटाघाटीमुळे सप्लाय चेनचे पुनर्विनियोजन वेगाने झाले. ऍपलने पहिल्या तिमाहीच्या शेवटी मोठ्या प्रमाणावर स्टॉक तयार केला आणि दुसऱ्या तिमाहीतही तीच पातळी टिकवण्याचा प्रयत्न केला. अहवालात नमूद केल्याप्रमाणे, सॅमसंगने दुसऱ्या तिमाहीत आपला स्टॉक वाढवला, ज्यामुळे त्याच्या शिपमेंटमध्ये वर्षभरात ३८ टक्क्यांनी वाढ झाली. यात गॅलेक्सी ए-सिरीज डिव्हाइसेसचा मोठा वाटा होता.







