32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेषकुलदीप, अश्विनने इंग्लंडला घातला लगाम

कुलदीप, अश्विनने इंग्लंडला घातला लगाम

जयस्वालचा विक्रम, भारत ८३ धावांनी पिछाडीवर

Google News Follow

Related

हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथे सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत भारताने पहिल्या दिवशी दमदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला २१८ धावांवर रोखून भारताने १ बाद १३५ धावा केल्या आहेत. अद्याप ८३ धावांनी भारत पिछाडीवर आहे.

इंग्लंडचा पहिला डाव भारतीय फिरकीपटूंच्या चमकदार कामगिरीमुळे २१८ धावांवर रोखला गेला. कुलदीप यादवने ७२ धावांच्या बदल्यात इंग्लंडचे ५ फलंदाज टिपले तर आपली १०० वी कसोटी खेळणाऱ्या आर. अश्विनने पहिल्या डावात ४ बळी मिळविले. इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रॉलीने ७९ धावांची सर्वोत्तम खेळी केली. बाकी फलंदाज मात्र अर्धशतकी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. त्यामुळे इंग्लंडला २१८ या धावसंख्येपर्यंतच झेप घेता आली. तसेही ही मालिका ३-१ अशी भारताने आधीच खिशात घातलेली आहे.

जयस्वालची गावस्करांशी बरोबरी

दरम्यान, भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने या मालिकेत सलग दोन द्विशतके ठोकली होती. या पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याची खेळी ५७ धावांवर आटोपली पण त्याने आपल्या कारकीर्दीतील चौथे अर्धशतक ठोकले. जयस्वालने कसोटी क्रिकेटमधील आपल्या १००० धावा पूर्ण केल्याच पण लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली. जयस्वालने एकाच कसोटी मालिकेत ७०० धावा करणाऱ्या सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

१५व्या षटकात शोएब बशीरला चौकार लगावून त्याने १६ डावांत १००० धावा करण्याची कामगिरी केली. याआधी, विनोद कांबळीने १४ डावांत एवढ्या धावा केलेल्या आहेत. १००० धावा कमी सामन्यांत करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने सुनील गावस्कर आणि चेतेश्वर पुजारा यांनाही (११ सामने) मागे टाकले आहे. जयस्वालने ९ सामन्यांतच ही धावसंख्या पार केली आहे. त्याशिवाय, कमी वयात १००० धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाजही ठरला आहे. त्याने २२ वर्षे ७० दिवस या वयात ही कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकरने १९ वर्षे २१७ दिवस, कपिल देव २१ वर्षे २७ दिवस, रवी शास्त्री २१ वर्षे १९७ दिवस या वयात ही कामगिरी केली होती.

एकाच कसोटी मालिकेत ७०० धावा करण्याचा पराक्रमही जयस्वालने केला. त्याबाबतीत त्याने सुनील गावस्कर यांच्याशी बरोबरी केली. सुनील गावस्कर यांनी मात्र १९७१चा वेस्ट इंडिजचा पदार्पणाचा दौरा (७७४) आणि घरच्या मैदानावर विंडीजविरुद्ध १९७८-७९ मध्ये (७३२) ७०० धावांचा टप्पा एकाच मालिकेत ओलांडला होता. जयस्वालच्या खात्यात या मालिकेत ७१२ धावा झालेल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा