केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांच्याशी भारत आणि जर्मनीदरम्यान संरक्षण, अवकाश, नवनिर्मिती (इनोव्हेशन) आणि ऑटोमोबाइलमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. या भेटीबद्दल माहिती देताना पीयूष गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर म्हटले, “जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांच्यासोबत भारत आणि जर्मनीच्या व्यापारी प्रतिनिधी मंडळांच्या एका बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. या बैठकीत बाजारापर्यंत पोहोच, नियामक चौकट (रेगुलेटरी फ्रेमवर्क) आणि व्यापार वाढवण्यावर चर्चा करण्यात आली.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही दोन्ही देशांमधील भागीदारी वाढवण्यासाठी संरक्षण, अवकाश, नवनिर्मिती आणि ऑटोमोबाइलमधील सहकार्यावरही चर्चा केली.” याशिवाय, पीयूष गोयल यांनी आणखी एका पोस्टमध्ये म्हटले की, जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडफुल यांच्यासोबतची बैठक खूपच फलदायी होती. आमची चर्चा द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांना चालना देण्यावर, तसेच सामायिक विकास आणि समृद्धीसाठी नवनिर्मिती, शाश्वतता, तंत्रज्ञान आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांमध्ये सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्यावर केंद्रित होती.
हेही वाचा..
लंडनमधील मराठी अस्मितेस बळ; महाराष्ट्र भवनासाठी फडणवीसांकडून पाच कोटींचा निधी!
फरारी मेनपाल ढिल्लाला कंबोडियातून आणले
CAA मध्ये अंतिम तारीख वाढवली, पाक-बांगलादेशातून येणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंना मोठा दिलासा!
राहुल गांधी, तेजस्वी यादव यांच्या सांगण्यावरून आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली
याव्यतिरिक्त, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनीही त्यांच्या जर्मन समकक्षासोबत भेट घेतली. संयुक्त पत्रकार परिषदेत जयशंकर म्हणाले, “मी हे पुन्हा सांगू इच्छितो की, आम्ही देशात व्यवसाय करण्याची सुलभता सतत सुधारण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत आणि मी आज माझ्या जर्मन समकक्षांना आश्वासन दिले की, भारतात येणाऱ्या, येथे स्थापित होणाऱ्या, येथे काम करणाऱ्या जर्मन कंपन्यांच्या कोणत्याही चिंतेवर आम्ही विशेष लक्ष देण्यास तयार आहोत.”
वेडफुल म्हणाले की, भारत जर्मनीचा प्रमुख आर्थिक आणि व्यापारी भागीदार आहे आणि येथे २०० हून अधिक जर्मन कंपन्या कार्यरत आहेत. २०२४-२५ मध्ये जर्मनी भारताचा 8वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. २०२३-२४ मध्ये तो भारताचा १२ वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि २०२२-२३ मध्ये ११ वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. एप्रिल २००० ते मार्च २०२५ पर्यंत १५.११ अब्ज डॉलर्सच्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीसह (एफडीआय) जर्मनी भारतात ९ वा सर्वात मोठा थेट विदेशी गुंतवणूकदार आहे.
