सेमिकंडक्टर हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी आहेत आणि चिप्ससाठी जागतिक मागणी सातत्याने वाढत आहे. मात्र, हा उद्योग काही विशिष्ट भौगोलिक भागांमध्ये केंद्रित असल्याने सप्लाय चेन अतिशय नाजूक बनली आहे. त्यामुळे उत्पादन क्षेत्राच्या जागतिक पातळीवरील विविधीकरणाची नितांत गरज निर्माण झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर भारत एक प्रमुख खेळाडू म्हणून पुढे येत आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम डिझाईन अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग (ESDM), इंडिया सेमिकंडक्टर मिशन आणि सेमिकॉन इंडिया कार्यक्रम यांसारख्या योजनांमुळे या क्षेत्रात एक सशक्त इकोसिस्टम उभे राहत आहे. २०३० पर्यंत ग्लोबल सेमिकंडक्टर मार्केट १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज असून, त्यात भारताचा मोठा वाटा असेल.
मे २०२५ मध्ये केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नोएडा आणि बेंगळुरू येथे दोन अत्याधुनिक सेमिकंडक्टर डिझाईन केंद्रांचे उद्घाटन केले. हे केंद्र विशेषतः अॅडव्हान्स ३ -नॅनोमीटर चिप डिझाईनवर लक्ष केंद्रित करतात, जे भारताच्या सेमिकंडक्टर नवप्रवर्तन प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. डिझाईन लिंक्ड इंसेंटिव्ह (DLI) योजना आणि चिप्स टू स्टार्टअप (C2S) कार्यक्रमांतर्गत स्टार्टअप्सना भरीव पाठबळ मिळत आहे.
हेही वाचा..
‘तुमच्या बाटग्या विचारांना हिंदू धर्माने कधीही स्थान दिले नाही!’
‘मोदी, योगी यांचे नाव घेण्यासाठी दबाव होता!’
बेंगळुरूमध्ये कॉलेज विद्यार्थिनीवर बलात्कार
नेत्रसेमी नावाच्या स्टार्टअपने स्मार्ट व्हिजन, सीसीटीव्ही कॅमेरा, IoT यांसारख्या अनुप्रयोगांसाठी चिप्स डिझाईन केल्या असून, १०७ कोटी रुपयांचे व्हेंचर कॅपिटल गुंतवणूक मिळवली आहे. ही कामगिरी सरकारच्या चिप डिझाईन योजनेमुळे शक्य झाली आहे. केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी ही यशोगाथा स्वागतार्ह ठरवली आणि सांगितले की भारतात डिझाईन करण्याची अफाट क्षमता आहे. त्यांच्या मते, सेमिकंडक्टर मिशनच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सहकार्यामुळे इतर भारतीय स्टार्टअप्सना देखील प्रेरणा मिळेल.
२०२२ पासून, DLI योजनेखाली सरकारने २२ कंपन्यांना एकूण २३४ कोटी रुपयांची सहाय्याची हमी दिली होती, ज्यांची एकूण प्रकल्प किंमत ६९० कोटी रुपये होती. या स्टार्टअप्सनी मिळून ३८० कोटींपेक्षा अधिक रक्कम VC गुंतवणूकदारांकडून उभी केली आहे. यातील पाच स्टार्टअप्सनी जागतिक चिप उत्पादकांसोबत त्यांचे डिझाईन तयार करून चाचणीही पार पाडली आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, ७२ हून अधिक कंपन्यांना अॅडव्हान्स सॉफ्टवेअर टूल्सची सुविधा दिली गेली आहे, ज्यामुळे त्यांना चिप डिझाईन करणे शक्य झाले आहे.
IIT हैदराबादच्या १४ व्या दीक्षांत समारंभात, केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, भारत सेमिकंडक्टर उत्पादनासाठी लागणारे उपकरणे व साहित्य स्वतः तयार करत आहे, त्यामुळे येत्या काही वर्षांत भारत सेमिकंडक्टर उत्पादक टॉप ५ देशांमध्ये असेल. इंडिया सेमिकंडक्टर मिशन (ISM) सारख्या कार्यक्रमांचा उद्देश म्हणजे भारतात एक भक्कम सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले इकोसिस्टम निर्माण करणे, ज्यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि डिझाईनसाठी जागतिक केंद्र म्हणून ओळखला जाईल.







