हद्दपार केलेल्या भारतीयांसाठी सरकारने विमान का पाठवले नाही?

विरोधकांची अजब मागणी

हद्दपार केलेल्या भारतीयांसाठी सरकारने विमान का पाठवले नाही?

अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या १०४ भारतीयांच्या प्रकरणावर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर गुरुवारी (६ फेब्रुवारी) निदर्शने केली. अमृतसरचे खासदार गुरुजीत सिंग औजला यांच्यासह अनेक खासदार निर्वासितांवरील कथित गैरवर्तनाचे प्रतीक म्हणून हातकड्या घालून निषेधात सहभागी झाले.

काँग्रेसचे खासदार गुरजीत सिंग औजला यांनी चिंता व्यक्त करताना म्हटले की, “त्यांना ज्या पद्धतीने आणण्यात आले ते चुकीचे होते. त्यांचा अपमान करण्यात आला. त्यांचे हातपाय साखळदंडांनी बांधण्यात आले होते. जेव्हा आमच्या सरकारला आधीच माहित होते की त्यांना हद्दपार केले जाणार आहे, तेव्हा त्यांना परत आणण्यासाठी त्यांनी व्यावसायिक विमान पाठवायला हवे होते.”

“ते तिथे बेकायदेशीरपणे गेले होते, परंतु तिथे गेल्यानंतर त्यांनी कोणताही मोठा गुन्हा केला नाही… आम्ही सभापतींना नोटीस दिली आहे आणि यावर चर्चा होऊ शकते,” असे औजला पुढे म्हणाले. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेनेगल, समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव आणि इतर अनेक नेत्यांनी संसदेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर हातकड्या घालून निषेध केला. ‘कैदी नव्हे तर मनुष्य आहेत’, भारता हा अपमान सहन करणार नाही, असे लिहिलेले फलक हातात घेत ‘मोदी सरकार उत्तर द्या’ अशा घोषणा नेत्यांनी दिल्या.

हे ही वाचा : 

मध्य प्रदेशात हवाई दलाचे लढावू विमान मिराज कोसळले, वैमानिक सुरक्षित!

पुष्पवर्षाव, आलिशान एसयुव्ही… पीओकेमध्ये हमास नेत्यांना जैश, लष्करच्या दहशतवाद्यांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट

‘येशूच्या क्रोधाला घाबरा, देवांच्या मूर्ती तोडा’

पतीला वाचवण्यासाठी पत्नीचे धाडसी पाऊल

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, जे भारताला विश्वगुरू बनवण्याचे स्वप्न दाखवत होते, ते आता गप्प का आहेत? भारतीय नागरिकांना गुलामांसारखे हातकड्या घालून आणि अमानवीय परिस्थितीत भारतात पाठवले जाते. परराष्ट्र मंत्रालय काय करत आहे? या अनादरापासून मुलांना आणि महिलांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने काय केले? सरकारने याचे उत्तर द्यावे आणि विरोधकांना संसदेत या विषयावर चर्चा करण्याची परवानगी द्यावी अशी इच्छा असल्याचे म्हटले.

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा म्हणाल्या, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी हे खूप चांगले मित्र आहेत, असे बोलले जाते. मग पंतप्रधान मोदींनी हे का होऊ दिले? त्यांना परत आणण्यासाठी आपण आपले स्वतःचे विमान पाठवू शकलो नसतो का? मानवांशी असेच वागले जाते का? त्यांना हातकड्या घालून आणि बेड्या घालून परत पाठवले जाते का?, परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधानांनी उत्तर द्यावे.”

Exit mobile version