भारताने ओडिशाच्या किनाऱ्याजवळ एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणाली (IADWS) ची पहिली यशस्वी चाचणी केली असल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.
ही स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांनी विकसित केली असून, तिची उड्डाण चाचणी शनिवारी दुपारी १२.३० वाजता करण्यात आली.
ही चाचणी भारताने पाकिस्तान व पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (PoK) मधील दहशतवादी ठिकाणांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हवाई हल्ले केल्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ही कारवाई केली होती, ज्यामुळे आण्विक शस्त्रधारी दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला.
“मी DRDO, भारतीय सशस्त्र सेना आणि उद्योग क्षेत्राचे IADWS विकसित करण्यात यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन करतो,” असे सिंह यांनी एक्स (X) वर लिहिले.
हे ही वाचा:
राहुल गांधी बोलतात तेव्हा त्यांचे खासदार अस्वस्थ होतात!
श्री गुरु ग्रंथ साहिब यांच्या प्रकाश पर्वानिमित्त श्री हरमंदिर साहिब येथे भाविकांची गर्दी
लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल रॅलीचे अमरावतीत आगमन
गुजरात: भारत-पाकिस्तान सीमेवर १५ पाकिस्तानी मच्छिमारांना अटक
IADWS ही बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली असून त्यात पूर्णपणे स्वदेशी क्विक रिअॅक्शन सरफेस टू एअर मिसाईल (QRSAM), अॅडव्हान्स्ड व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम (VSHORADS) क्षेपणास्त्रे आणि उच्च शक्तीच्या लेझरवर आधारित डायरेक्टेड एनर्जी वेपन (DEW) यांचा समावेश आहे.
“ही अद्वितीय उड्डाण चाचणी आपल्या देशाच्या बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमतेची खात्री देते आणि शत्रूच्या हवाई धोक्यांपासून महत्त्वाच्या स्थळांच्या संरक्षणासाठी बळकटी प्रदान करणार आहे,” असे मंत्री म्हणाले.







