27 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरविशेषभारताकडून पाकिस्तान सीमेवर एस-४००ची पाचवी ढाल

भारताकडून पाकिस्तान सीमेवर एस-४००ची पाचवी ढाल

जम्मू-काश्मीरमध्ये तैनातीची तयारी

Google News Follow

पाकिस्तानकडून वाढत्या लष्करी हालचाली आणि सीमापार दहशतवादाचा धोका लक्षात घेऊन भारताने पश्चिम सीमेवरील हवाई संरक्षण अधिक मजबूत करण्याची तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून रशियाकडून मिळणारी पाचवी एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या (एलओसी) सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२७ पर्यंत ही प्रणाली तैनातीसाठी सज्ज होण्याची शक्यता आहे.

या प्रणालीच्या ताब्यापूर्वी तपासणी करण्यासाठी भारतीय हवाई दलाचे पथक पुढील महिन्यात रशियाला भेट देणार आहे. सध्या भारताकडे चार एस-४०० प्रणाली कार्यरत आहेत. त्यापैकी तीन पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये तैनात असून, चौथी आसाममध्ये तैनात आहे. अरुणाचल प्रदेशातील १,१२६ किलोमीटर लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) सुरक्षेसाठी चौथ्या प्रणालीचा वापर केला जात आहे.

४०० किमीपर्यंत लक्ष्य भेदण्याची क्षमता

एस-४०० ही रशियन बनावटीची लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आहे. विमान, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि इतर हवाई धोक्यांचा ४० ते ४०० किलोमीटर अंतरावरून मुकाबला करण्याची तिची क्षमता आहे. मे २०२५ मधील ऑपरेशन सिंदूरदरम्यान या प्रणालीने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी लढाऊ विमाने, हवाई देखरेख यंत्रणा आणि इलेक्ट्रॉनिक गुप्तचर प्रणालींना लक्ष्य करण्यातही तिने भूमिका बजावली होती.

हे ही वाचा : 

हसीनांच्या माजी उप प्रसिद्धी सचिवासह तिघांना अटक

ममतांच्या भावाची पुतण्या अभिषेक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

नोकरीची संधी देत टेस्लाकडून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना

कॅनडातील टोरंटो विमानतळावर विमान उलटले; १८ प्रवासी जखमी

दरम्यान, चीन आणि तुर्कीकडून पाकिस्तानला लष्करी मदत मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने संरक्षण सज्जता वाढवण्यावर भर दिला आहे. पाकिस्तान चीनकडून आठ हँगोर श्रेणीतील पाणबुड्या खरेदी करत आहे. तसेच तुर्की आणि चीनकडून ड्रोन व अन्य लष्करी उपकरणांची मदत मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा