27 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरविशेषभारतीय ऍप 'कू'ने मिळवला 'हा' सन्मान

भारतीय ऍप ‘कू’ने मिळवला ‘हा’ सन्मान

Google News Follow

Related

‘कू’ या भारतीय मायक्रोब्लॉगिंग ऍपने नुकताच एशिया पॅसिफिक (एपीएसी) क्षेत्रातल्या लोकप्रिय ५ उत्पादनांमध्ये स्थान मिळवण्याचा बहुमान पटकावला आहे. ‘अ‍ॅम्प्लिट्यूड’च्या २०२१ च्या प्रॉडक्ट रिपोर्टमधून ही माहिती देण्यात आली आहे. ‘कू’ हा भारतीय बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेत लिहिण्याची संधी या ऍपद्वारे मिळते. एपीएसी (APAC)  युएस (US) आणि इएमइए (EMEA) क्षेत्रामधून या अहवालात मानांकन मिळवणारा ‘कू’ हा एकमेव सामाजिक प्रसारमाध्यमांचा ब्रॅन्ड ठरला आहे. भारतीय ब्रॅन्ड्सपैकी दोनच ब्रॅन्ड्सना हा बहुमान मिळालेला आहे. कॉइनसीडीएक्स (CoinDCX) हा ‘कू’सोबतचा दुसरा ब्रॅन्ड आहे ज्याला हा सन्मान मिळाला आहे.

अ‍ॅम्प्लिट्यूडच्या वर्तन आलेखातला (बिहेविअरल ग्राफ) डाटा, आपलं डिजीटल जगणं घडवणाऱ्या नव्या आणि आगळ्यावेगळ्या डिजीटल उत्पादनांना समोर आणतो. या रिपोर्टमध्ये ‘कू’विषयी लिहिले आहे की, “हा एक आगळावेगळा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जो भारतीयांना आपापल्या मातृभाषांमध्ये व्यक्त होण्याची संधी देतो. कू १ अब्जाहून जास्त भारतीयांचे आवडते ॲप बनण्यासाठी तत्पर आहे.” मातृभाषेत व्यक्त होण्यासाठी भारतीय बनावटीचे ॲप असलेल्या ‘कू’चा प्रवास सुरू झाला तो मार्च २०२० मध्ये. नऊ भाषांमध्ये सेवा देत ‘कू’ने केवळ २० महिन्यांच्या अल्पकाळात दीड कोटी युजर्सची पसंती मिळवली आहे. दर्जेदार तंत्रज्ञान आणि कल्पक अनुवाद सुविधांमुळे ‘कू’ ने पुढच्या वर्षभरात 10 कोटी डाऊनलोड्सचा टप्पा पूर्ण करणे अपेक्षित आहे.

हे ही वाचा:

भाजपाने सुरू केली मथुरेची तयारी?

उत्तर कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

ममता बॅनर्जी यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान!

…आणि त्यावेळी अर्धवट बुद्धिवादी मूग गिळून गप्प होते

‘अ‍ॅम्प्लिट्यूड रिपोर्ट २०२१’ बाबत बोलताना ‘कू’ चे सहसंस्थापक आणि सीइओ अप्रमेय राधाकृष्णन म्हणाले, “‘कू’ने या जागतिक अहवालात स्थान मिळणे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सोबतच ‘कू’ एशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्वाधिक हव्याहव्याशा पाच डिजीटल प्रॉडक्ट्सपैकी एक म्हणूनही निवडले गेले आहे. आम्ही एकमेव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहोत, ज्याला एपीएसी (APAC)  युएस (US) आणि इएमइए (EMEA) क्षेत्रामधून मानांकन मिळाले आहे. आम्ही संपूर्ण जगासाठी भारतातून एक ब्रॅन्ड घडवतो आहोत. त्यामुळे हा सन्मान आमच्यासाठी उल्लेखनीय आहे. हे मानांकन आम्हाला डिजीटल अवकाशातले भाषिक अडथळे ओलांडण्यासाठी प्रोत्साहन देईल. सोबतच यातून आम्हाला संस्कृती आणि भाषिक वैविध्यापलिकडे जात लोकांना एकमेकांशी जोडण्याची प्रेरणा मिळेल.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा