माईलस्टोन स्कूलमध्ये झालेल्या विमान अपघाताबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त करत सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती. याच पार्श्वभूमीवर भारतीय उच्चायोगाने मंगळवारी बांगलादेश सरकारला अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे, भारतीय उच्चायोगाने अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना भारतात आवश्यक असलेली कोणतीही वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी माहिती देण्याची विनंती बांगलादेश सरकारला केली आहे.
भारतीय उच्चायोगाने स्पष्ट केले की, जखमींच्या उपचारासाठी भारत सरकारकडून सर्व आवश्यक सुविधा आणि मदतीची हमी दिली जाईल. ढाका विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘एक्स’वर लिहिले होते : “ढाकामधील विमान अपघातात अनेक लोक (बहुतेक विद्यार्थी) मृत्युमुखी पडल्याच्या आणि जखमी झाल्याच्या बातमीने मी अत्यंत दुःखी आणि सुन्न झालो आहे. या दुःखद क्षणी आम्ही पीडित कुटुंबीयांसोबत आहोत. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. भारत या कठीण प्रसंगी बांगलादेशसोबत खंबीरपणे उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.”
हेही वाचा..
बोईंग विमानांच्या इंधन स्विचची तपासणी पूर्ण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला
फुफ्फुस विकारग्रस्तांना डॉ. दातार यांच्याकडून मदतीचा हात
मुंबईत विकली गेली १४,७५० कोटी रुपयांची लक्झरी घरे
इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने मंगळवारी सांगितले की, या दुर्घटनेत मृतांचा आकडा २७ वर गेला आहे, यामध्ये २५ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये अनेक १२ वर्षांखालील लहान मुले होती. इतर दोन मृतांमध्ये विमानाचा वैमानिक आणि एक शिक्षिका यांचा समावेश आहे. सध्या ७८ जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, ज्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. २० मृतदेह नातेवाइकांकडे सोपवण्यात आले असून सहा मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही; त्यांचे डीएनए नमुने घेण्यात आले आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे, सोमवारी दुपारी १ वाजून ६ मिनिटांनी बांगलादेश एअर फोर्सच्या एफ-७ बीजीआय ट्रेनिंग एअरक्राफ्टने उड्डाण घेतले होते. सुमारे १.३० च्या सुमारास हे विमान ढाकामधील उत्तरा परिसरातील माईलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या इमारतीवर कोसळले.







