23 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरविशेषइंडियन आयडल विजेता प्रशांत तमांग यांचे ४३व्या वर्षी निधन

इंडियन आयडल विजेता प्रशांत तमांग यांचे ४३व्या वर्षी निधन

हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू

Google News Follow

Related

लोकप्रिय गायक व अभिनेता, तसेच ‘इंडियन आयडल’ सीझन ३ चे विजेते प्रशांत तमांग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ११ जानेवारी २०२६ रोजी ही दु:खद बातमी समोर आली असून, त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण संगीत आणि मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे चाहते, सहकारी कलाकार आणि संगीतप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत तमांग यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्यांना कार्डिएक अरेस्ट आला आणि त्यांचे निधन झाले. कुटुंबीयांनी व जवळच्या मित्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हे ही वाचा:
इराणमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप?

‘लाडकी बहीण योजना’ अखंड सुरूच राहणार

वाहन कर्ज फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एलन मस्क करणार ‘एक्स’चा नवा अल्गोरिदम सार्वजनिक

२००७ साली ‘इंडियन आयडल’ सीझन ३ जिंकून प्रशांत तमांग देशभरात घराघरांत पोहोचले. साधा स्वभाव, प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आणि मधुर आवाज ही त्यांची ओळख होती. स्पर्धेदरम्यान मिळालेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके बनले. शो जिंकल्यानंतर त्यांनी हिंदीसह नेपाळी आणि इतर भाषांतील गाणी गायली. यासोबतच त्यांनी अभिनय क्षेत्रातही पाऊल टाकत काही चित्रपट व वेब प्रोजेक्ट्समध्ये भूमिका साकारल्या.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक नामवंत कलाकार, संगीत दिग्गज आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली. “अतिशय नम्र, मेहनती आणि गुणी कलाकार” अशा शब्दांत अनेकांनी त्यांची आठवण काढली. प्रशांत तमांग यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीने एक आशादायक आणि प्रतिभावान कलाकार गमावला आहे. त्यांच्या आवाजाची आणि कार्याची आठवण संगीतप्रेमींच्या मनात कायम राहील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा