28.2 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरविशेषभारतीय लष्कराची 'आकाश' गवसणी

भारतीय लष्कराची ‘आकाश’ गवसणी

Google News Follow

आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)ने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की आकाश प्राईम क्षेपणास्त्राने शत्रूच्या विमानाची नक्कल करणाऱ्या मानवरहित हवाई लक्ष्यला कसे अचूकतेने भेदले आहे.

डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेचारच्या सुमारास विमानाची चाचणी घेण्यात आली. “विद्यमान आकाश प्रणालीच्या तुलनेत, आकाश प्राइम क्षेपणास्त्र सुधारित अचूकतेसाठी स्वदेशी सक्रिय आरएफ साधकासह सुसज्ज आहे. इतर सुधारणा उच्च तापमानावर तसेच समुद्र सपाटीपासून उंचावर अधिक विश्वासार्ह कामगिरी सुनिश्चित करतात.” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विद्यमान आकाश शस्त्र प्रणालीची सुधारित ग्राउंड प्रणाली उड्डाण चाचणीसाठी होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आकाश संशोधन क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), भारतीय सेना, भारतीय हवाई दल आणि इतर भागधारकांचे अभिनंदन केले आहे.

राजनाथ सिंग म्हणाले की, आकाश प्राइम क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण चाचणीने डीआरडीओची जागतिक दर्जाची क्षेपणास्त्र यंत्रणेची रचना आणि विकास करण्याची क्षमता सिद्ध केली आहे.

हे ही वाचा:

नवजोत सिंह सिद्धू यांची ‘हिट विकेट’

पंजाबमध्ये भाजपाला ‘कॅप्टन’ मिळणार?

९१ वर्षांची सुरे’लता’

योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी

डीआरडीओचे अध्यक्ष जी सतीश रेड्डी यांनीही आकाश प्राइम क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण चाचणीत सहभागी झालेल्या संघाचे अभिनंदन केले. रेड्डी म्हणाले आकाश आकाश प्रणाली भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाचा आत्मविश्वास आणखी वाढवेल कारण आकाश प्रणाली आधीच समाविष्ट करण्यात आली आहे आणि आता अधिक प्राणघातक क्षेपणास्त्रांसह सुधारत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा