जुलै महिन्यात भारतीय औषध बाजाराने (IPM) तब्बल ७.९ टक्क्यांची वाढ नोंदवून एक नवा टप्पा गाठला आहे. विशेष बाब म्हणजे, हृदयविकार व मधुमेहावरील उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बाजारात नव्याने आलेल्या औषधांचा जोरदार प्रभाव दिसून आला आहे.
फार्मा क्षेत्रातील संशोधन संस्थेची ‘फार्मारॅक’ ही अहवाल सादर करताना म्हणते की,
-
हृदयविकारावरील औषधांची विक्री १४.१% ने वाढली,
-
तर मधुमेहविरोधी उपचारांची विक्री ९% ने उंचावली.
या दोन सेगमेंट्सचा एकत्रित वाटा देशांतर्गत औषध बाजारात सुमारे २५% आहे.
रेस्पिरेटरी, युरोलॉजी, अँटी-कॅन्सर औषध गटांमध्येही दुहेरी टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
💬 “किमतीत वाढ आणि नव्या ब्रँड्समुळे बाजारात चैतन्य!”
फार्मारॅकच्या उपाध्यक्ष शीतल सपाले यांचा खुलासा
“जुलैमध्ये अनेक उपचार गटात नव्या उत्पादनांची भर पडली, किमतीत वाढ झाली आणि त्यामुळे एकंदर बाजारात सकारात्मक गती निर्माण झाली,” असं फार्मारॅकच्या कमर्शियल उपाध्यक्षा शीतल सपाले यांनी सांगितलं.
त्यांनी असंही नमूद केलं की,
“हृदय व अँटी-इन्फेक्शन सेगमेंटमध्ये विक्रीत ठोस वाढ झाली आहे, तर मधुमेहविरोधी औषधांमध्ये नव्या ब्रँड्समुळे चांगली हालचाल झाली आहे.”







