रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारत सध्या २७ आंतरराष्ट्रीय सिग्नलिंग प्रकल्पांचे नेतृत्व करत आहे आणि जगभरातील ४० अतिरिक्त प्रकल्पांना सहाय्य पुरवत आहे. बंगळुरूचे डिजिटल एक्सपीरियन्स सेंटर हे जगभरातील १२० हून अधिक प्रकल्पांमध्ये सहकार्य करून नाविन्यतेला चालना देत आहे. हे केंद्र IoT, AI, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षेचा वापर करून नेक्स्ट जनरेशन सिग्नलिंगवर लक्ष केंद्रित करत आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘डिझाइन, डेव्हलप आणि डिलिव्हर’ या संकल्पनेअंतर्गत भारतातून रेल्वे उत्पादनांची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याअंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाला मेट्रो कोच, तर यूके, सौदी अरेबिया, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाला कोच बोग्या पाठवण्यात आल्या आहेत. याशिवाय, फ्रान्स, मेक्सिको, रोमानिया, स्पेन, जर्मनी आणि इटली या देशांना प्रोपल्शन सिस्टम्सची सप्लाय झाली आहे. मोझांबिक, बांगलादेश आणि श्रीलंकाला पॅसेंजर कोच, तर मोझांबिक, सेनेगल, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश आणि गिनी प्रजासत्ताक यांना रेल्वे इंजिन्सची निर्यात झाली आहे.
हेही वाचा..
‘पाकिस्तानने गुडघे टेकल्यामुळेच शस्त्रसंधी’
पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, तीनही दहशतवादी मारले!
नागकूपात दर्शनासाठी भाविकांची रांग
लोकसभेतील गोंधळावर अमित शाह यांचा संताप
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच वडोदरा, गुजरात येथील एल्सटॉमच्या सावली प्लांटला भेट दिली. हा प्लांट भारतातील रेल्वे वाहननिर्मितीचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यांनी प्लांटमधील एल्सटॉमच्या ऑपरेशन्सची पाहणी केली आणि देखभाल प्रक्रियेचे सखोल मूल्यमापन केले. सावली प्लांट ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या शासकीय उपक्रमांशी पूर्णपणे बांधील राहून लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी आधुनिक दर्जाचे कम्युटर आणि ट्रान्झिट ट्रेन कोच तयार करत आहे.
नाविन्यपूर्णता आणि उत्पादनक्षमतेवर विशेष लक्ष केंद्रित करून, भारतातील ३,४०० हून अधिक अभियंते जगभरातील २१ एल्सटॉम प्लांट्ससोबत सक्रियपणे सहकार्य करत आहेत. भारताने २०१६ पासून विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पांसाठी एकूण १,००२ रेल कोच यशस्वीरित्या निर्यात केले आहेत, ज्यामुळे भारताची ओळख एक विश्वासार्ह आधुनिक रेल्वे सिस्टीम पुरवठादार म्हणून झाली आहे. यापैकी ४५० कोच सावली प्लांटमध्ये तयार करून ते ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड मेट्रो प्रकल्पासाठी निर्यात करण्यात आले आहेत.







