पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अहमदाबाद येथील हंसलपूर येथे सुजुकीच्या पहिल्या ग्लोबल स्ट्रॅटेजिक बॅटरी इलेक्ट्रिक व्हेइकल (बीईव्ही) ‘ई-विटारा’ला हिरवा झेंडा दाखवला. या प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता जगातील डझनभर देशांत जी ईव्ही धावेल, त्यावर ‘मेड इन इंडिया’ असे लिहिलेले असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आता जागतिक स्तरावर ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करत आहे. मोदी यांनी सांगितले की, आता भारतात बनवलेल्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स (ईव्ही) १०० हून अधिक देशांमध्ये निर्यात केल्या जाणार आहेत. देशात हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड मॅन्युफॅक्चरिंगचीही सुरुवात झाली आहे.
मोदींनी आठवण करून दिली की, भारताच्या यशोगाथेची बीजे सुमारे 13 वर्षांपूर्वी पेरली गेली होती. २०१२ मध्ये जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी मारुती सुजुकीला हंसलपूर येथे जमीन दिली होती. त्यांनी सांगितले, “व्हिजन तेव्हाही आत्मनिर्भर भारताचे होते आणि मेक इन इंडियाचे होते. आपले तेव्हाचे प्रयत्न आज देशाच्या संकल्पपूर्तीत इतकी मोठी भूमिका बजावत आहेत.” पंतप्रधान म्हणाले, “इलेक्ट्रिक वाहनांच्या इकोसिस्टममध्ये बॅटरी हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारत बॅटर्यांसाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून होता. इलेक्ट्रिक वाहननिर्मिती मजबूत करण्यासाठी भारतातही बॅटरी उत्पादन सुरू करणे आवश्यक होते. ह्याच दृष्टिकोनातून आम्ही २०१७ मध्ये टीडीएसजी बॅटरी प्लांटची पायाभरणी केली. या कारखान्यात तीन जपानी कंपन्या एकत्र येऊन बॅटरी सेलचे उत्पादन करणार आहेत.
हेही वाचा..
हिमंता बिस्वसर्मांनी केली ३० हजार एकर जमीन अतिक्रमणमुक्त
बिहार निवडणुकीपूर्वी भाजपाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता!
काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल प्रकरण:”ही शिक्षा नाही, फक्त अंतर्गत तडजोड”
झारखंडमधील सुर्या हांसदा प्रकरण: “ही बनावट चकमक होती”
हा स्थानिकीकरणाचा उपक्रम आपल्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला नवी ताकद देईल. पंतप्रधानांनी सर्व राज्यांना आवाहन केले की, त्यांनी या संधीचा पूर्ण लाभ घ्यावा. ते म्हणाले, “मी सर्व राज्यांना आमंत्रण देतो. चला, रिफॉर्मची स्पर्धा करू, प्रो-डेव्हलपमेंट पॉलिसीची स्पर्धा करू, गुड गव्हर्नन्सची स्पर्धा करू.” यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाचे ध्येय आहे की २०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र व्हावे.







