23 C
Mumbai
Friday, January 9, 2026
घरविशेषइंझमाम उल हक म्हणतो, आयपीएलवर बहिष्कार टाका!

इंझमाम उल हक म्हणतो, आयपीएलवर बहिष्कार टाका!

इतर बोर्डांना खेळाडू न पाठवण्याचे आवाहन 

Google News Follow

Related

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अपमानामुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक संतापला असून बीसीसीआयविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. एका लाईव्ह शो दरम्यान बोलताना ते म्हणाले, इतर देशांच्या क्रिकेट बोर्डांनीही इंडियन प्रीमियर लीगवर बहिष्कार टाकावा. यामागील कारण सांगताना ते म्हणाले की, बीसीसीआय आपल्या खेळाडूंना परदेशी टी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी पाठवत नाही. अशा परिस्थितीत, इतर देशांच्या क्रिकेट बोर्डांनीही त्यांचे खेळाडू तिथे खेळण्यासाठी पाठवू नयेत.

५५ वर्षीय माजी पाकिस्तानी कर्णधार म्हणाला, ‘चॅम्पियन्स ट्रॉफी बाजूला ठेवा, तुम्ही आयपीएल पहा. जगातील सर्व अव्वल खेळाडू आयपीएलमध्ये येतात आणि खेळतात. पण भारतीय खेळाडू इतर लीगमध्ये खेळायला जात नाहीत. म्हणून, सर्व बोर्डांनी त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये पाठवणे थांबवावे. जर तुम्ही तुमच्या खेळाडूंना एखाद्या लीगसाठी बाहेर पाठवत नाही तर दुसऱ्या बोर्डांनी देखील तसा निर्णय का घेवू नये?.

दरम्यान, भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरच भारतीय क्रिकेटपटूला परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळते. दिनेश कार्तिकने गेल्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली, त्यानंतर तो SA२० मध्ये पार्ल रॉयल्सकडून खेळला. युवराज सिंग आणि इरफान पठाण यांच्यासारख्या खेळाडूंनी GT२० कॅनडा आणि लंका प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांमध्ये देखील भाग घेतला आहे, परंतु भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरच ते शक्य आहे.

हे ही वाचा : 

बांगलादेशचे राजदूत म्हणतात, युनूस सरकारमुळे देशात अराजक, हिंदूंवर अत्याचार

मणिपूरमध्ये पोलिसांना मोठे यश, चार दहशतवाद्यांना अटक!

संभलमध्ये उत्साहात होळी, कडक सुरक्षा, ड्रोनच्या मदतीने नजर

राऊतांनी रोज सकाळी ९ वाजताचा शिमगा बंद करुन महाराष्ट्राच्या हितासाठी सूचना कराव्यात

तथापि, हा नियम महिला क्रिकेटपटूंना लागू होत नाही. स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज सारख्या देशातील स्टार महिला खेळाडू ‘बीबीएल,’ ‘द हंड्रेड’ आणि जगभरातील इतर लीगमध्ये भाग घेत राहतात. बीसीसीआयने बनवलेला हा नियम फक्त पुरुष खेळाडूंना लागू आहे. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या १८ वा हंगामाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. तर अंतिम सामना २५ मे रोजी ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. तर पाकिस्तान सुपर लीग (PSL) ११ एप्रिल ते १८ मे दरम्यान खेळवली जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा