भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, राजस्थानच्या बिकानेरजवळ क्षेपणास्त्राचा बूस्टर आणि नोज कॅप सापडल्याने हालचालींना वेग आला आहे. ही अवशेषं ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाईलच्या लाँचनंतर पडणाऱ्या भागाशी मिळतीजुळती असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून पाकिस्तानवर हल्ला करताना ब्रम्होसचा वापर झाला का, याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.
हे अवशेषं भारत-पाक सीमा भागातील दुर्गम भागात सापडले. भारताच्या अलीकडील प्रतिहल्ला मोहिमेदरम्यान (Operation Sindoor) ब्रह्मोसचा वापर झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईत पाकिस्तानमधील बहावलपूर (Jaish-e-Mohammad मुख्यालय) यावर अचूक हल्ला झाला होता. या प्रकारामुळे पाकिस्तानच्या दहशतवादी पायाभूत सुविधांना मोठा धक्का बसला.
हे ही वाचा:
भारताविरुद्ध पाकला ड्रोन पुरविणाऱ्या तुर्कीचे सफरचंद आम्हाला नको!
इंदिरा गांधींच्या मुद्द्यावरून थरूर म्हणाले, १९७१ आणि २०२५ ची परिस्थिती वेगळी आहे
मुंबईत फटाके आणि रॉकेट उडविणाऱ्यावर बंदी
भारताने या हल्ल्यात लक्ष्य केलेली पाकिस्तानी लष्करी ठिकाणे : एअरबेस : रफिकी (शोरकोट), मुरिद (चकवाल), नूर खान (रावळपिंडी), रहीम यार खान, सुक्कूर, चूनियन (कसूर),
रडार केंद्रे : पस्रूर, सियालकोट
भारताने फक्त लष्करी लक्ष्यांवर अचूक हल्ले करताना नागरिक हानी टाळली.
पाकिस्तानकडून आधी झालेले हल्ले :
-
२६ ठिकाणी ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले (श्रीनगर ते नलिया पर्यंत)
-
भारताच्या उधमपूर, पठाणकोट, आदमपूर व भुज येथील हवाई तळांवर नुकसान
भारताने याला उत्तर देताना वायुदलाने तत्काळ हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय केल्या. विंग कमांडर व्योमिका सिंग व कर्नल सोफिया कुरेशी यांच्या मते “एअर-लाँच प्रिसिजन वेपन्स” वापरले गेले. पाकिस्तानचे हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा खोटा असल्याचे उपग्रह प्रतिमा सादर करून खंडन करण्यात आले.
दरम्यान, IAF ने सांगितले की, “ऑपरेशन सिंदूर” ही भारताची रणनीतिक प्रतिहल्ला मोहीम अजूनही सुरू आहे, जरी भारत व पाकिस्तानने अलीकडेच हा प्रश्न सोडविण्याचा विचार केला असला तरी मोहीम सुरू राहणार आहे.







