28 C
Mumbai
Monday, March 2, 2026
घरविशेषसमाजजागृतीसाठी वाहिलेल्या जनसेवा प्रतिष्ठान फाऊंडेशनचे उद्घाटन

समाजजागृतीसाठी वाहिलेल्या जनसेवा प्रतिष्ठान फाऊंडेशनचे उद्घाटन

आयआरएस समीर वानखेडे, उद्योगपती प्रशांत कारुळकर यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम

Google News Follow

Related

समाजजागृती, सामाजिक जबाबदारी यासाठी वाहिलेल्या जनसेवा प्रतिष्ठान फाऊंडेशनचा शुभारंभ २१ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या समारंभाला आयआरएस अधिकारी समीर वानखेडे, प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत करुळकर, कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल जोशी कारुळकर तसेच जनसेवा प्रतिष्ठान फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर शेख उपस्थित होते.

या शुभारंभासोबतच समाजजागृती, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांवर आधारित राष्ट्रीय चळवळीची सुरुवात झाली असल्याची घोषणा करण्यात आली. शब्बीर शेख यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था लोककल्याण आणि राष्ट्रनिर्माणासाठी समर्पित लोकव्यापी व्यासपीठ म्हणून उभे राहण्याचा संकल्प करते.

हे ही वाचा:

चुकीची आर्थिक उत्पादने विकलीत तर याद राखा!

२०२८ पर्यंत भारताला मिळणार पहिले स्वदेशी मरीन इंजिन!

पवन हंस हेलिकॉप्टरचे अंदमानच्या समुद्रात क्रॅश-लँडिंग

“अमेरिकन टॅरिफमध्ये कोणतीही वाढ मान्य नाही”

या संस्थेची पुढील ध्येये आहेत.

दृष्टिकोन

जागृत, सक्षम आणि जबाबदार समाज उभारणे; युवकांचे सबलीकरण देणे; सामाजिक धोक्यांपासून समुदायांचे संरक्षण करणे; तसेच न्याय, समता आणि राष्ट्रीय एकात्मता यांना प्रोत्साहन देणे.

ध्येय

१) अंमली पदार्थविरोधी मोहिम

तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान, शैक्षणिक कार्यशाळा आणि समुदायाधारित कार्यक्रम राबवून अमली पदार्थांच्या व्यसनमुक्तीसाठी प्रभावी पावले उचलणे.

२) सायबर गुन्हे प्रतिबंध उपक्रम

डिजिटल साक्षरता वाढवणे, नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करणे आणि ऑनलाइन फसवणूक व सायबर धोक्यांना आळा घालण्यासाठी संबंधित प्राधिकरणांशी सहकार्य करणे.

३) युवक सबलीकरण

युवकांना मार्गदर्शन, कौशल्यविकास, नेतृत्व प्रशिक्षण आणि समाजहितासाठी सकारात्मक योगदान देण्याच्या संधी उपलब्ध करून देणे.

४) सामाजिक कल्याण व न्याय

वंचित घटकांना कायदेविषयक जागरूकता, सामाजिक सहाय्य कार्यक्रम आणि समान संधी व सन्मान सुनिश्चित करणारे उपक्रम राबवून साथ देणे.

ही संस्था महाराष्ट्रासह देशभरात दीर्घकालीन परिणाम साधण्यासाठी शासकीय यंत्रणा, शैक्षणिक संस्था आणि नागरी समाज संघटनांसोबत समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करते. जनसेवा प्रतिष्ठान फाउंडेशन ही सेवा, प्रामाणिकता आणि परिवर्तनशील कृती यांना बांधिल राहून अधिक सक्षम आणि समृद्ध भारत घडवण्यास कटिबद्ध आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा