30.4 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरविशेष३३ वर्षांनंतर जंतरमंतर सर्वसामान्यांसाठी खुले!

३३ वर्षांनंतर जंतरमंतर सर्वसामान्यांसाठी खुले!

बॅरिकेड्स हटवले, वाहतूक सुरू

Google News Follow

दिल्लीतील जंतरमंतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दीर्घकाळापासून लागू असलेल्या निर्बंधांमधून अखेर दिलासा मिळाला आहे. दिल्ली पोलिसांनी या परिसरात लावलेले अडथळे हटवले आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांसह या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशींनंतर जंतरमंतरला अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळण्यात आले होते. या निर्णयानंतर काही दिवसांनी पोलिसांनी अडथळे हटवण्याची कारवाई केली आहे.

तब्बल ३३ वर्षांपासून देशातील आंदोलने आणि निदर्शनांचे मुख्य केंद्र राहिलेले दिल्लीचे ऐतिहासिक ‘जंतर-मंतर’ आता सर्वसामान्य जनता आणि वाहतुकीसाठी पूर्णपणे खुले करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी येथील कडक सुरक्षा व्यवस्था आणि बहुस्तरीय बॅरिकेडिंग काढून घेत या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत केली आहे. वर्ष १९९३ मध्ये जंतर-मंतरला अधिकृत आंदोलन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून वर्षभर शेतकरी, कामगार, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष येथे निदर्शने करत आले आहेत. मात्र, आता या परिसराचे चित्र पूर्णपणे बदलले आहे.

हे ही वाचा:

लष्करासाठी गेमचेंजर ठरणार जीपीएस शिवाय ड्रोनला दिशा देणारे तंत्रज्ञान

राहुल गांधी पुन्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार?

पंजाबमध्ये तस्करीचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त, १६ जण अटकेत

इराण युद्धामुळे रिपब्लिकन पक्षाचा पराभव!

दिल्ली पोलिसांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यातच जंतर-मंतरला अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळले होते. त्यानंतर आज येथील सुरक्षेचे अनेक थर असलेली बॅरिकेडिंगही हटवण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी तैनात असणारे पॅरामिलिट्री फोर्स, क्विक रिस्पॉन्स टीम आणि दंगलविरोधी वाहने देखील तेथून हटवली जात आहेत. त्यामुळे आता या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना आणि सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा