25 C
Mumbai
Saturday, January 17, 2026
घरविशेषइतिहासाच्या पानांत ७ जानेवारी: काय घडले होते?

इतिहासाच्या पानांत ७ जानेवारी: काय घडले होते?

इतिहास घडवणाऱ्या घटनांचा आढावा

Google News Follow

Related

इतिहासाच्या पानांत ७ जानेवारी या तारखेला विज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिक घडामोडींच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घटनांनी स्थान मिळवले आहे. या दिवशी घडलेल्या काही उल्लेखनीय घटनांचा आढावा घेऊया.

गॅलिलिओ यांनी केलेला ऐतिहासिक शोध (१६१०)

प्रसिद्ध इटालियन खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांनी ७ जानेवारी १६१० रोजी प्रथमच गुरू ग्रहाच्या चार उपग्रहांचे (चंद्रांचे) निरीक्षण केले. हा शोध खगोलशास्त्राच्या इतिहासातील क्रांतिकारी टप्पा मानला जातो आणि त्याने सूर्यकेंद्रित विश्वाच्या सिद्धांताला बळ दिले.

पहिला आंतरखंडीय दूरध्वनी संवाद (१९२७)

७ जानेवारी १९२७ रोजी अमेरिका आणि ब्रिटन यांच्यातील पहिला ट्रान्स-अटलांटिक टेलिफोन कॉल यशस्वीरीत्या करण्यात आला. या घटनेने जागतिक दळणवळणाच्या इतिहासात नवे पर्व सुरू झाले. न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.

अमेरिकेतील पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रिया (१७८९)

१७८९ साली याच दिवशी अमेरिकेतील पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली होती. पुढे जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले.

हे ही वाचा..

₹ ऐवजी टाइप केले $; बसला १६ लाखांचा फटका

अभिनेता विजयला सीबीआयकडून आले बोलावणे!

“राज ठाकरेंनी पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केलाय!”

‘वीबी जीरामजी’ योजनेमुळे खुश झाले मजूर

आणखीही काही महत्त्वाच्या घटना-

  • १६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.
  • १९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.
  • १९३५: कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले.
  • १९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
  • १९६८: अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.
  • १९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
  • १९७८: एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्‍यांसह होनोलुलू जवळील महासागरात बेपत्ता झाली.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा