ममता बॅनर्जी सरकार संचालित पश्चिम बंगाल उर्दू अकादमीने ‘साहित्यिक महोत्सव’ पुढे ढकलला आहे. ‘हिंदी चित्रपटात उर्दू’ या शीर्षकाचा हा कार्यक्रम ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान कोलकाता येथे होणार होता. चर्चा, कविता वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत उर्दूच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आला असून याचे कारण प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर असल्याचे सांगितले जात आहे.
खरे तर, या साहित्यिक महोत्सवातील मुशायरा कार्यक्रमात जावेद अख्तर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, पश्चिम बंगालमधील धर्मवादी, कट्टरतावादी मुस्लीम संघटनांनी आक्षेप नोंदवून ममता सरकारला कार्यक्रम बंद पडण्यास भाग पाडले.
पश्चिम बंगाल मधील जमीयत उलेमा-ए-हिंद ही संघटना जावेद अख्तर यांच्या निमंत्रणाला विरोध करत होती. त्यानंतर उर्दू अकादमीने हा निर्णय घेतला आहे. जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख सध्या टीएमसी नेते सिद्दीकुल्लाह चौधरी आहेत. ते पश्चिम बंगाल सरकारमध्ये मंत्री देखील आहेत.
शनिवारी (३० ऑगस्ट) जमीयत उलेमा-ए-हिंदने अकादमीला पत्र लिहून म्हटले आहे की, जावेद अख्तर यांच्या उपस्थितीमुळे अल्पसंख्याक समुदायाला दुखावले जाऊ शकते. पत्रात म्हटले आहे की, जावेद अख्तर यांनी इस्लामबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आहे. अशा परिस्थितीत अल्पसंख्याक समुदाय त्यांना सहन करू शकत नाही.
हे ही वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करणाऱ्या चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन
सेमिकंडक्टरच्या भविष्यातील निर्मितीबाबत जग भारतावर विश्वास ठेवते
‘पंजाब तुमचे एटीएम नाही, आधीच तुमच्या ऐषोआरामावर कोट्यवधी रुपये वाया गेलेत’
पश्चिम बंगालमधील जमीयतचे सरचिटणीस मुफ्ती अब्दुस सलाम म्हणाले, जावेद अख्तर यांनी इस्लामचा अपमान केला आहे आणि म्हणूनच ते त्यांचा विरोध करतात. ते म्हणाले, जावेद अख्तर हे एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत आणि त्यांचे उर्दूतील योगदान देखील महत्त्वाचे आहे. तथापि, त्यांनी इस्लामवर भाष्य करून चुकीचे केले. जेव्हा लोकांना कळले की जावेद अख्तर यांना आमंत्रित करण्यात आले आहे, तेव्हा निषेध सुरू झाला. काहीही असो, पश्चिम बंगाल उर्दू अकादमी केवळ अल्पसंख्याकांसाठी आहे. अशा परिस्थितीत, त्यांना अल्पसंख्याकांच्या भावनांचाही आदर करावा लागेल.
