हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेल्या अभिनेत्री कंगना रणौत यांनी पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांची भेट घेतली. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदल, आमदार विनोद कुमार आणि अन्य स्थानिक नेते उपस्थित होते. कंगनाने आपत्तीमुळे पीडित झालेल्या कुटुंबांप्रती सहवेदना व्यक्त करत विकास कामांद्वारे मदत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की नुकतीच काही पीडित कुटुंबांना आर्थिक मदतही वितरित करण्यात आली आहे. कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा उल्लेख करत सांगितले की, या योजनांचे लाभ प्रभावित लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. “आम्ही नेहमी जनतेच्या सोबत आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी संवादादरम्यान, कंगनाने काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्यावर जोरदार टीका केली. कंगना म्हणाली, जे लोक हिमाचलमध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, ज्यांना जनता शिव्या घालत आहे आणि सांगत आहे की पुढची २० वर्षे तरी काँग्रेस सरकार इकडे येऊ नये, त्यांनी मला उपदेश देण्याची आवश्यकता नाही. त्यांनी त्यांच्या लाजिरवाण्या स्थितीकडे लक्ष द्यावे. लोक इथे रडत आहेत आणि सांगत आहेत की मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने आले आणि वरून फोटो काढून निघून गेले. ज्या भागांमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, तिथे विक्रमादित्य काही लाख रुपयांची मदत देऊन केवळ दिखावा करत आहेत. हे लोक भ्रष्ट आणि ढोंगी आहेत.
हेही वाचा..
मतदार पडताळणी : भीती निर्माण करण्याचं राजकारण
योगींनी फी माफ केली काय म्हणाली गोरखपुरची पंखुडी?
नव्या नियमांची नव्हे, प्रभावी अंमलबजावणी गरज
भारतात वाहन विक्रीत बघा किती टक्क्यांची वाढ
कंगनाने पुढे सांगितले की, जेव्हा माझ्याकडे विचारलं जातं की हिमाचलचं पुनर्निर्माण कधी होईल, तेव्हा मी सांगते की त्यासाठी जबाबदारी ठरवणं आवश्यक आहे. मी एक खासदार आहे, माझ्याकडे कुठलाही कॅबिनेट दर्जा नाही. लोक माझ्या वक्तव्याचा फक्त एक भाग घेऊन प्रश्न उपस्थित करत आहेत, हे सगळे फक्त लबाड डावपेच आहेत, याने काहीच साध्य होणार नाही.
कंगनाने यावरही भर दिला की, आर्मीचं रेस्क्यू ऑपरेशन असो वा धान्यवाटप, हे सगळं केंद्र सरकारने केलं आहे. मदत पोहोचवणारे बहुतांश लोक भाजपचेच होते. राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरली आहे, आणि जनता देखील हे समजून चुकली आहे. आता ‘कंगना-कंगना’ असं ओरडून काहीच होणार नाही. जनतेने यांचे खरे चेहरे पाहिले आहेत. जयराम ठाकुर यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर, कंगनाने सांगितले, आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. आम्ही सगळे एकाच पक्षाचे सहकारी आहोत आणि एकाच उद्देशासाठी काम करत आहोत. जोपर्यंत आपण व्यावसायिक पद्धतीने राहू, तोपर्यंत सर्व काही ठीक असेल.







