29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरविशेषकंगनाचा 'थलायवी' बघा मोठ्या पडद्यावर! 'या' दिवशी होणार प्रदर्शित

कंगनाचा ‘थलायवी’ बघा मोठ्या पडद्यावर! ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Google News Follow

Related

सुपरस्टार कंगना रानौत हिचा बहुचर्चित थलायवी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून देशभरातील नागरिकांना मोठ्या पडद्यावर म्हणजेच चित्रपटगृहात जाऊन या चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे.

सुरुवातीला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ही २३ एप्रिल जाहीर करण्यात आली होती. पण त्या काळात कोविड महामारीची दुसरी लाट देशभरात उसळली होती. त्यामुळे देशभरातील चित्रपटगृहे बंद होती. या कारणास्तव चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. दरम्यानच्या काळात अनेक चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्म्स वर प्रदर्शित झाले. पण थलायवी हा मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा निर्धार होता. त्यानुसार आता हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

पंजाबमधील शाळा ओळखल्या जाणार हॉकीपटूंच्या नावाने!

भाई जगतापांचा काँग्रेसच्याच नितीन राऊत यांना झटका

अरेरे! अखेर विष पिणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

राष्ट्रवादीचे प्रफु्ल्ल पटेल का गेले ईडी कार्यालयात?

अवघ्या काही दिवसांत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १० सप्टेंबर रोजी या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. निर्मात्यांकडून या संबंधीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाची मुख्य नायिका कंगना रानौत हिनेदेखील आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून हे जाहीर केले आहे.

हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तमिळ चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार राहिलेल्या आणि सहा वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झालेल्या जयललिता यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे. अभिनेत्री कंगना रानौत या चित्रपटात जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. तर तिच्यासोबतच अभिनेता अरविंद स्वामी हा देखील झळकणार आहे. जयललिता यांचे मार्गदर्शक आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.जी रामचंद्रन यांच्या भूमिकेत अरविंद स्वामी दिसेल. एकेकाळी रोजा, बॉम्बे, सपने असे हिट चित्रपट देणारा हा अभिनेता बऱ्याच वर्षांनी हिंदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय यांनी केले असून विष्णु वर्धन इंदुरी आणि शैलेश सिंह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा