27 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरविशेषकांजूरमार्गसाठी २ लाख ट्रक माती आणली तर उडणार वाहतुकीची धूळधाण

कांजूरमार्गसाठी २ लाख ट्रक माती आणली तर उडणार वाहतुकीची धूळधाण

Google News Follow

Related

मुंबईमध्ये सध्याच्या घडीला कोस्टल रोड तसेच इतर अनेक कामे सुरु आहेत. या सर्व कामांचा राडारोडा सध्याच्या घडीला कांजूर येथे भराव म्हणून टाकण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे हा राडारोडा टाकण्यासाठी तब्बल २ लाख ट्रक माती लागणार आहे. परंतु ही दोन लाख ट्रक माती मुंबईत आली तर मुंबईतील वाहतूकीचा चांगलाच बोजवारा उडणार आहे. अजूनही सर्वांसाठी लोकलप्रवास परवानगी नाही. त्यातच हे ट्रक मुंबईत येऊ लागले तर, मात्र रस्ते वाहतूकीची अक्षरशः वाट लागणार आहे. त्यामुळेच वाहतूक कोंडीची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.

मुंबईमध्ये सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचा राडारोडा सध्याच्या घडीला कुठे टाकायचा हा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळेच यासंबंधीचा आराखडा अजूनही तयार झाला नाही. आराखडा तयार करणे, तो मंजूर करणे, सविस्तर प्रकल्प अहवालासाठी निविदा मागवणे अशा अनेक गोष्टी बाकी आहेत. त्यामुळेच आता कारशेड उभारण्याच्या निर्णयानंतरही मुंबईकरांना मेट्रोसाठी चांगलीच भलीमोठी वाट पाहावी लागणार आहे.

कारशेडकरता प्रस्तावित असलेल्या भूखंडावर जमीन बांधकाम करण्यायोग्य व्हायला हवा. याकरता ५ मीटरपर्यंत खोलीचा भराव टाकावा लागणार आहे. तसेय याकरता २ लाख ट्रक मातीची गरज भासणार आहे. एका ट्रकमध्ये केवळ १० क्यूबिक मीटर माती समाविष्ट होते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा हिशेब काढल्यास तब्बल २ लाख ट्रक मातीची गरज लागणार आहे. तरच योग्य भराव घातला जाईल.

हे ही वाचा:

सिद्धूंच्या राजीनाम्याने वाढली अर्चना पूरणसिंगची चिंता!

पंतप्रधानांनी लोकार्पण केले ३५ प्रकारच्या पिकांचे वाण

महाराष्ट्रातील मोफत शिवभोजन थाळी झाली बंद; आता मोजा इतके पैसे

साकीनाका बलात्कार प्रकरणी ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल

सद्यस्थितीमध्ये शहरातील अनेक भागात मेट्रो प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु आहे. परंतु अजूनही कारशेडचा पत्ता नसल्याने आता सर्व मेट्रो प्रकल्प लांबणीवर पडणार आहेत हे याआधीच स्पष्ट झाले आहे. तसेच मेट्रो प्रकल्प लांबणीवर पडल्यामुळे, आता खर्चातही चांगलीच वाढ होणार आहे हे ओघाने आलेच. भविष्यात मेट्रो प्रकल्प पूर्ण झाला तरी कारशेडअभावी अनेक मेट्रो मार्ग रखडण्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा