34 C
Mumbai
Wednesday, October 27, 2021
घरदेश दुनियासिद्धूंच्या राजीनाम्याने वाढली अर्चना पूरणसिंगची चिंता!

सिद्धूंच्या राजीनाम्याने वाढली अर्चना पूरणसिंगची चिंता!

Related

नवजोतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रसेच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेतच, पण या घटनेनंतर सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली ती अभिनेत्री अर्चना पूरणसिंगची.

सध्या कपिल शर्मा शोमध्ये जजच्या भूमिकेत असलेल्या अर्चना पूरणसिंग यांनी नवजोत सिद्धूंची जागा घेतली होती. त्याआधी, कपिल शर्मा शोमध्ये सिद्धू हेच जज म्हणून दिसत. शेरोशायरी आणि हास्याचे फवारे असाच माहोल तिथे असे. पण सिद्धू यांनी राजकारणात उडी घेतल्यानंतर मात्र अर्चना पूरणसिंग यांनी ती जागा घेतली. तेव्हापासून कपिल शर्मादेखील त्यांची टेर खेचत असे.

आता सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर अर्चना पूरणसिंग ट्रेंडिंगवर आहेत. एका नेटकऱ्याने बंद दरवाजाचे चित्र टाकले आहे. त्या दरवाजाला अनेक लॉक लावण्यात आली आहेत. त्याखाली मेसेज लिहिले आहे की, कपिल शर्माच्या शोच्या सेटचा दरवाजा.

हे ही वाचा:

‘परब यांनी आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती तर…’

…अखेर ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड इतिहासजमा

पंतप्रधानांनी लोकार्पण केले ३५ प्रकारच्या पिकांचे वाण

महाराष्ट्रातील मोफत शिवभोजन थाळी झाली बंद; आता मोजा इतके पैसे

एकाने लिहिले आहे की, लवकरच सिद्धू कपिल शर्माची भेट घेणार. एक प्रतिक्रिया आली आहे की, सिद्धू यांच्या राजीनाम्यामुळे सर्वाधिक नाराज जर कुणी असेल तर ती अर्चना पूरणसिंग. यानिमित्ताने वेगवेगळे मिम्स बनवून ट्विटही करण्यात आले आहेत. एका नेटकऱ्याने तर लिहिले आहे की, अर्चना पूरणसिंगने नौकरी डॉट कॉमवर आपले प्रोफाइल टाकले आहे. तीदेखील नव्या नोकरीच्या शोधात आहे. एकाने तर कहर केला आहे. काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष म्हणून आता अर्चना पूरणसिंगचे नाव चर्चेत आहे, असे त्याने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,446अनुयायीअनुकरण करा
4,450सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा