28.3 C
Mumbai
Monday, July 13, 2026
घरविशेषकरीना कपूरला कोरोनाची लागण

करीना कपूरला कोरोनाची लागण

Google News Follow

Related

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. करीना कपूर खानसह अभिनेत्री अमृता अरोरा हिचाही कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या दोघींनी मुंबईतील पार्ट्यांमध्ये उपस्थित राहून कोरोना संबंधी नियमांचे उल्लंघन केले होते. मुंबई महापालिकेने करीना आणि अमृता यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा या सुपर स्प्रेडर असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनेक बॉलिवूड स्टार्सना सतत भेटत असतात. तसेच, या दोन्ही अभिनेत्रींनी गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावण्याची माहिती ‘टीव्ही ९’ने सूत्रांमार्फत दिली आहे. बीएमसीने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या संपर्कातील आणखी काही सेलिब्रिटींचे कोरोना अहवाल आज समोर येऊ शकतात.

हे ही वाचा:

अंधेरीतील बारच्या तळघरातून १७ मुलींची सुटका

‘म्हणून’ फ्रांससाठी रविवार ठरला ऐतिहासिक

श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान

मोदींनी कशी विश्वनाथ मंदिरातून, नागरिकांकडे ‘या’ तीन प्रतिज्ञा मागितल्या

नुकतीच करीना कपूर तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसली होती. या पार्टीत तिची बहीण करिश्मा कपूर, मलायका अरोराही सामील झाली होती. ही पार्टी अनिल कपूरची मुलगी रिया कपूरच्या घरी ठेवण्यात आली होती. त्यामुळे या व्यक्तींनाही कोरोना संसर्ग होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा