31 C
Mumbai
Sunday, March 15, 2026
घरविशेषमराठी भाषिकांना विरोध करणारी कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक!

मराठी भाषिकांना विरोध करणारी कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निषेध

Google News Follow

Related

सीमा भागातील मराठी भाषिकांना विरोध करण्याची कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक असल्याचे सांगत कर्नाटक सरकारचा निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (९ डिसेंबर) विधानपरिषदेत सांगितले. यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

यावर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने विरोध केला. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य यांना अटक करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींना स्थानबद्ध करण्यात आले. या कर्नाटक सरकारच्या कृत्याचा महाराष्ट्र सरकार तीव्र शब्दात निषेध करीत आहे.

मी देखील मराठी भाषिकांच्या लढ्यात तुरुंगवास भोगला असून याप्रश्नी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती तीच भूमिका आमच्या सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीने वकील दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील यापूर्वी या प्रश्नाबाबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन देखील कर्नाटक सरकार अशी भूमिका घेत असेल तर कर्नाटक सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो.  महाराष्ट्रातील जनता कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या पाठीमागे उभी असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

कर्नाटक काँग्रेसचा मुजोरीपणा, विधानसभेतून वीर सावरकरांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय!

‘जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्या’ला फडणवीसांनी का केला फोन?

शक्तीकांत दास निवृत्त होणार, हे आहेत रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर!

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘विमा सखी योजने’चे उद्घाटन!

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा