29.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरविशेषखोपोली लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल

खोपोली लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल

Google News Follow

Related

मध्य रेल्वेच्या पळसदरी–खोपोली मार्गावर पुढील दोन महिने विशेष नाइट ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रात्रीच्या लोकल प्रवाशांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत. रेल्वेच्या पायाभूत सुविधांशी संबंधित कामांसाठी १८/१९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून हा ब्लॉक सुरू होणार आहे. प्रत्येक गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री १.३० ते पहाटे ४.३० या वेळेत पळसदरी–खोपोलीदरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावर रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या सुधारित वेळापत्रकाची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.

ब्लॉकमुळे सीएसएमटीहून खोपोलीकडे जाणारी रात्रीची शेवटची लोकल रात्री १०.५७ वाजता सुटणार आहे. तसेच खोपोलीहून रात्री ११.२० वाजता सुटणारी कर्जत लोकल ही ब्लॉकपूर्वीची शेवटची सेवा असेल. खोपोलीहून रात्री १२.३० वाजता सुटणारी कर्जत लोकल या कालावधीत रद्द करण्यात आली आहे. याशिवाय बुधवारी रात्री ११.१८ वाजता सीएसएमटीहून सुटणारी खोपोली लोकल खोपोलीऐवजी कर्जतपर्यंतच धावणार आहे. त्यामुळे खोपोली परिसरातील प्रवाशांना विशेषतः रात्रीच्या प्रवासासाठी पर्यायी नियोजन करावे लागणार आहे.
हे ही वाचा:
पृथ्वी शॉचा आकृती अग्रवालसोबत काडीमोड

भात उत्पादनात यंदा ६.५ टक्के घट होण्याची शक्यता

टाटा सन्सच्या अध्यक्षपदी चंद्रशेखरन यांना ५ वर्षांची मुदतवाढ

थायलंडला हरवून पाकिस्तान उपांत्य फेरीत

दरम्यान, ब्लॉक संपल्यानंतर पहाटेची लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल. कर्जतहून खोपोलीकडे जाणारी पहिली लोकल पहाटे ५.४३ वाजता सुटेल, तर खोपोलीहून सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल पहाटे ४.५० वाजता रवाना होणार आहे. रेल्वेच्या आवश्यक पायाभूत कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत असल्याने काही काळ प्रवाशांची गैरसोय होणार असली, तरी कामाच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारच्या रात्री या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लोकलच्या बदललेल्या वेळा लक्षात घेऊनच घराबाहेर पडणे महत्त्वाचे ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा