27.3 C
Mumbai
Monday, July 6, 2026
घरविशेषकोहलीची नवी बादशाही!

कोहलीची नवी बादशाही!

Google News Follow

Related

‘रन मशीन’ विराट कोहलीने महान सचिन तेंडुलकरलाही मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘प्लेयर ऑफ द सीरीज’ जिंकण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अप्रतिम कामगिरी करत — १५१ च्या सरासरीने ३०२ धावा ठोकत — कोहलीला मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू घोषित करण्यात आले.

ही त्याच्या कारकिर्दीतील २०वी वेळ आहे, तर सचिन तेंडुलकरने १९ वेळा हा मान मिळवला होता. बांगलादेशचा शाकिब अल हसन (१७) तिसऱ्या क्रमांकावर, तर जॅक्स कॅलिस (१४) आणि सनथ जयसूर्या (१३) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

वनडे फॉर्मेटमध्ये कोहलीचा हा ११ वा ‘प्लेयर ऑफ द सीरीज’ पुरस्कार आहे. या यादीत तो सनथ जयसूर्या बरोबर संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकर १४ पुरस्कारांसह अव्वल आहे.

टेस्ट आणि टी२० मधून निवृत्त झालेला ३७ वर्षीय विराट कोहली आता फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळतो, आणि त्याचा फॉर्म प्रचंड आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ७४* धावांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने १३५, १०२ आणि ६५* धावा करून मालिकेत धडाका उडवला.

विशाखापट्टणमचे एसीए–वीडीसीए मैदान तर कोहलीचे लाडके! इथे त्याने ८ डावांत १०८.६६ च्या सरासरीने तब्बल ६५२ धावा केल्या आहेत. या मैदानावरील तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने प्रथम दक्षिण आफ्रिकेला २७० धावांवर रोखले आणि नंतर ३९.५ षटकांत विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली. कोहली आणि यशस्वी जायसवाल (११६*) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८४ चेंडूत ११६ धावांची विजयी भागीदारी केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
319,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा