प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा भारतात येण्यापूर्वीच चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून होती. मेस्सीच्या स्वागतासाठी चाहत्यांनी विमानतळावर देखील प्रचंड गर्दी केली होती. शनिवारी, सॉल्ट लेक स्टेडियममध्ये मेस्सीला पाहण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येने चाहते जमले होते. मेस्सीच्या आगमनानंतर काही वेळातच गोंधळ उडाला. मैदानात मेस्सी फार काळ न राहिल्याने संतप्त चाहत्यांनी मैदानात गोंधळ घातला. तसेच खुर्च्या आणि बाटल्या फेकण्यास सुरुवात केली.
जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉलपटूची एक झलक पाहता न आल्याने संतप्त चाहत्यांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आणि मैदानात प्रवेश केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गैरव्यवस्थेबद्दल आश्चर्य व्यक्त करत या गोंधळाची चौकशी करण्याचे आदेश दिले. बॅनर्जी यांनी गोंधळाबद्दल लिओनेल मेस्सी आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागितली.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “सॉल्ट लेक स्टेडियममधील गोंधळामुळे मला खूप दुःख झाले आहे आणि धक्का बसला आहे. मी लिओनेल मेस्सी आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागते.” स्टेडियममध्ये गोंधळ उडाला तेव्हा ममता बॅनर्जी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जात होत्या.
मेस्सी शनिवार, १३ डिसेंबर रोजी सॉल्ट लेक स्टेडियममध्ये दाखल झाला. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच मेस्सी स्टेडियममधून निघून गेल्याने उपस्थित चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. संतप्त चाहत्यांनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. काहींनी खुर्च्या आणि बाटल्या फेकत निषेध व्यक्त केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली की “GOAT टूर”चे आयोजक शताद्रु दत्ता आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना मेस्सीला स्टेडियमबाहेर सुरक्षितपणे बाहेर काढावे लागले.
हे ही वाचा:
स्टेडियममधून मेस्सी लवकर निघून गेल्याने चाहत्यांचा संताप! खुर्च्या, बाटल्या फेकत निषेध
उत्तर प्रदेशातील ‘जामतारा’; मथुरेतील चार गावांमधून ४२ जणांना अटक
तिरुप्परनकुंद्रम कार्तिक दीप प्रज्वलनाला ‘उबाठा’चा का आहे विरोध?
घुसखोरीच्या प्रयत्नात असताना जैश संबंधित दहशतवाद्याला अटक
स्टेडियममध्ये सुरुवातीला सन्मान सोहळा पार पडला, मात्र हा सोहळा अपेक्षेपेक्षा फारच कमी वेळेचा झाला. अवघ्या काही मिनिटांतच मेस्सी स्टेडियममधून निघून गेल्याने उपस्थित चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. मेस्सीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये जमले होते. तिकिटांसाठी हजारो रुपये खर्च केले होते. मात्र, मेस्सी मैदानात फार वेळ न थांबल्याने चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. मेस्सी निघून गेल्यानंतर सॉल्ट लेक स्टेडियममध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त चाहत्यांनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. काहींनी खुर्च्या आणि बाटल्या फेकत निषेध व्यक्त केला.







